गतीमान प्रशासन उपक्रमाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:27 PM2019-05-29T12:27:45+5:302019-05-29T12:27:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासकीय कामकाज गतिमान करुन नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रशासकीय कामकाज गतिमान करुन नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिका:यांनी नवापुरात बैठक घेतली़ यावेळी तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला़
जिल्हा प्रशासन आठवड्यातील एक दिवस तालुकास्तरावर जाऊन कामकाज करणार असल्याचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी यापूर्वी जाहिर केले होत़े त्यानुसार मंगळवारी या उपक्रमाचा शुभारंभ नवापूर तालुक्यातून करण्यात आला. उपक्रमादरम्यान अधिका:यांनी तालुक्यातील विविध भागात भेटी दिल्या़़ अधिका:यांनी विकासकामे, योजना, टंचाईग्रस्त गावांमध्ये भेटी दिल्या़ जिल्हाधिकारी मंजुळे हे धनराट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत आवश्यक सुविधांसह इमारतीचे त्वरीत हस्तांतरीत करण्याच्या सुचना केल्या़ तसेच धनराट आश्रमशाळा आणि सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटीकेस भेट देऊन वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची माहिती घेतली. दरम्यान तहसील कार्यालयात कामकाज आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, तहसीलदार सुनिता ज:हाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
क्षेत्रभेटीवर गेलेल्या अधिका:यांनी नवापुर तालुक्यात उपस्थित असलेल्या जिल्हाधिका:यांची भेट घेत तात्काळ आढावा सादर केला़ यात त्रुटी असलेल्या योजना आणि कामांना गती देण्याच्या सूचना केल्या़ जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी टंचाईग्रस्त गावांना कुरडी आणि खैरवे धरणातून पाणी देण्याच्या सुचना केल्या़ प्रसंगी लोकप्रतिनिधींनी बाजू मांडली़ चिंचपाडा येथील रोहयोच्या कामांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नवापुर पालिकेत भेट देत लोकप्रतिनिधी व अधिका:यांसोबत संवाद साधला़ स्वच्छ भारत, प्रधानमंत्री आवास योजना आणि 14 व्या वित्त आयोगांतर्गत योजनांचे प्रस्ताव तातडीने पुर्ण करून कामांना गती देण्याचे त्यांनी सांगितल़े