पहिली आंतरराष्ट्रीय शाळा उधार-उसनवारीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:57 PM2018-01-11T12:57:44+5:302018-01-11T12:57:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा कारभार सध्या उधार-उसनवारीवर सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून जेवनाचे बील थकले आहे. बील न मिळाल्यास परवापासून जेवनही बंद होणार आहे. शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे विद्याथ्र्याचे हाल सुरू असून सोयी-सुविधा नसतांना, नियोजन नसतांना शाळा सुरू करण्याची घाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या कारणामुळे शाळा
धडगाव गटातील तोरणमाळ केंद्रात 852 शाळाबाह्य मुले सव्र्हेक्षणात आढळून आली आहेत. तोरणमाळ केंद्र हे अतिदुर्गम भागात आहे. तोरणमाळ ग्रृप ग्रामपंचायतीत एकुण 29 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये एकुण 1665 मुल शिक्षण घेतात. येथील वाडे, पाडे विखुरलेले असल्यामुळे शाळेपासून अशा वस्तींचे अंतर अधीक असल्याने शाळाबाह्य मुलांची संख्या जास्त आहे. शिवाय शाळा बांधकामासाठी साहित्य नेण्यास दळणवळणाचा देखील अभाव आहे. परिणामी सर्व विद्याथ्र्याना एकाच ठिकाणी निवासी शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील ही पहिली आंतरराष्ट्रीय शाळा मंजुर करून ती सुरू करण्यात आली.
बांधकाम होईर्पयत नंदुरबारात
सद्य स्थितीत तोरणमाळ येथे जागा व इमारत उपलब्ध नसल्यामुळे नंदुरबार येथील शासकीय इंग्रजी आदिवासी निवासी शाळेच्या इमारतीत सोय करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी 118 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आला आहे. एकुण 1600 विद्याथ्र्याची सोय या शाळेत राहणार आहे. तोरणमाळ केंद्राअंतर्गत असलेल्या विद्याथ्र्यानाच त्या ठिकाणी सामावले जाणार आहे. त्याअंतर्गत तीन शाळा बंद करून त्या या केंद्रशाळेत समाविष्ट होणार आहेत. याशिवाय शाळाबाह्य मुलांनाही सामावून घेण्यात येणार आहे. यावर्षी शाळाबाह्य 65 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आला आहे. तोरणमाळ येथे पाच हेक्टर जागा मिळाली आहे. त्याठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. एकुण 21 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.
सर्वच उधार-उसनवारीने
सध्या या शाळेत सर्वच कारभार हा उधार-उसनवारीने सुरू आहे. सध्या सुरू असलेली शाळा ही आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेची इमारत आहे. या ठिकाणी असलेले शिक्षक प्रतिनियुक्तीवरील आहेत. भोजनाचा ठेका दिलेल्या संबधितांना पाच महिन्यांपासून मोबदलाच दिला गेला नाही. नंदुरबारातील मानसी महिला बचत गट येथे आहार पुरविण्याचे काम करते.
या बचत गटाचे तब्बल सहा लाख 70 हजार रुपये आहार मोबदल्याचे घेणे आहे. परंतु शिक्षणाधिकारी कार्यालय त्याकडे दुर्लक्षच करीत आहे. आता पैसे द्या नाही तर भोजन देणे बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येथील व्यवस्थापनाची धावपळ उडाली आहे.