डेंग्यू रोखण्यासाठी किटकशास्त्रीय सव्र्हेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:49 PM2018-12-09T12:49:49+5:302018-12-09T12:49:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे किटकशास्त्रीय सव्र्हेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. विविध उपाययोजना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे किटकशास्त्रीय सव्र्हेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून त्याद्वारे डेंग्यूचे रुग्ण शोधण्याची मोहिम सुरू आहे.
जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण नंदुरबार शहरासह अनेक गावांमध्ये आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये डेंग्यू सदृष्य आजारांचे रुग्ण देखील मोठय़ा संख्येने उपचार घेत आहेत. ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागाने गांभिर्याने घेवून तातडीने उपाय योजनांना सुरूवात केली आहे.
आरोग्य विभागातर्फे सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये संपर्क करून डेंग्यू रुग्णांची माहिती घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याशिवाय विविध उपाययोजना देखील सुरू करण्यात आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. उपाययोजनांमध्ये जलद ताप रुग्ण सव्र्हेक्षण, डेंग्यूसाठी रक्त जल नमुने गोळा करणे, रक्त जल नमुने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविणे, डेंग्यू रुग्णांवर लागलीच उपचार करणे, किटकशास्त्रीय सव्र्हेक्षणास लागलीच सुरुवात करण्यात आली आहे. कंटेनर सव्र्हे देखील करण्यात आला आहे. अबेट अर्थात टॅमीफॉसचा वापर सुरू करण्यात आला आहे. याशिवाय पालिकेतर्फे धुरफवारणी करण्यात येत आहे. गटारी, साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी अळीनाशक औषधी फवारणी करण्यात येत आहे. लोकांमध्ये किटकजन्य आजारांबाबत जनजागृती देखील करण्यात येत आहे.
नागरिकांनी देखील काळजी घ्यावी. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण नियमित स्वरूपात आढळून येत आहेत. ऑगस्ट, सप्टेंबरनंतर वाढ होतांना दिसते. काही भागात अतिपाऊस, काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य, वाढते शहरीकरण, स्थलांतराचे पश्न, विविध विकास कामे या व अशा कारणांमुळे डेंग्यूचे प्रमाण विविध भागात अधीक दिसून येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी डेंग्यूचा प्रसारक डास रोखण्यासाठी नागरिकांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे घरातील पाण्याचे साठे झाकुन ठेवावे. आठवडय़ातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.