पतंगोत्सवातही भरला राजकीय रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 09:09 PM2019-01-08T21:09:28+5:302019-01-08T21:09:36+5:30
नंदुरबार : मकर संक्रांत अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपली आह़े यंदाचे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्याने याचे पडसाद येथील पतंगोत्सवावरही पडताना ...
नंदुरबार : मकर संक्रांत अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपली आह़े यंदाचे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्याने याचे पडसाद येथील पतंगोत्सवावरही पडताना दिसून येत आह़े विविध राजकीय नेत्यांची छबी तसेच आव्हान प्रतिआव्हान देणारे वाक्य पतंगीवर प्रिंट करण्यात आली आहेत़ त्यामुळे साहजिकच पतंगोत्सवात यंदा राजकीय रंग भरला जात असल्याचे बोलले जात आह़े
या वर्षी लोकसभा निवडणूक पार पडणार आहेत़ त्यामुळे विविध पक्षांचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सर्वच माध्यमातून आपला पक्ष, पक्षाचे नेते आदींचा प्रचार करताना दिसून येत आह़े लोकसभा निवडणुकींना अवघ्या पाच महिन्यांचा काळ उरला असल्याने सर्वच राजकीय नेते तसेच पदाधिकारी आता कामाला लागले आहेत़ जाहिरात, प्रसिध्दी हे निवडणुका जिंकण्याचे प्रभावी साधन म्हणून त्याचा वापर केला जाऊ लागला आह़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारातील पतंगोत्सवातही याचे प्रतिबिंब उमटतांना दिसून येत आह़े
किसमे कितना है दम
पतंग व्यापा:यांकडून नेहमीच देशातील चालू घडामोडींचा आढावा घेण्यात येत असतो़ व त्या पध्दतीने प्लॅस्टिक पतंगीवर वेगवेगळया छबी तयार करुन त्यांची विक्री करण्यात येत आह़े यंदाचे वर्ष लोकसभा निवडणुकांचे असल्याने राजकीय वतरुळात चर्चेचा चेहरा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या छबी असलेल्या पतंगला अधिक मागणी वाढली आह़े गांधी व मोदी यांची छबी असलेल्या पतंगीवर ‘किसमे कितना है दम’ असे वाक्य लिहण्यात आले आह़े त्यामुळे या पतंगीकडे ग्राहक अधिक आकर्षित होताना दिसून येत आहेत़
त्याच प्रमाणे विविध राजकीय नेत्यांची छबी असलेल्या पतंगही कार्यकत्र्याकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत़ यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मै हू विकास’ या पतंगीचीही मोठय़ा प्रमाणात चर्चा आह़े दरम्यान, मागील वर्षी उद्घाटीत झालेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, बेटी बचाओ देश बचाओ, झालर पतंग, प्लॅस्टिक मेटल पतंग, सप्तरंगी पतंग आदी विविध प्रकारच्या पतंगला ग्राहकांकडून अधिक मागणी आह़े त्याच प्रमाणे मांजामध्येही साखळ 8, पांडा गोल्ड, बरेली मांजा आदी प्रकारच्या मांजाला अधिक मागणी आह़े त्यातच साखळ 8 या प्रकारच्या मांजाला विशेष मागणी असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, 10 रुपयांमध्ये 5 पतंगपासून तर, 700 रुपयांना 5 पतंगर्पयत विविध प्रकारांमध्ये पतंग उपलब्ध आहेत़ दरवर्षी पेक्षा यंदा पतंग व मांजाचा व्यवसाय जोरात असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आह़े
लाखोंची उलाढाल
मकर संक्रांतीनिमित्त गुजरात राज्यात मोठय़ा प्रमाणात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असत़े नंदुरबार जिल्हा लागूनच असल्याने साहजिकच तेथील सांस्कृतिक, सामाजिक परंपरांचे बिंब नंदुरबारातही उमटताना दिसून येत असत़े त्यामुळे नंदुरबारातही मोठय़ा संख्येने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असत़े साधारणत: महिन्याभरा पुर्वीच नंदुरबारात पतंगोत्सवाचे वेध लागत असतात़ मकर संक्रांतीच्या दिवशी तर प्रत्येक जण आपआपल्या गच्चीवर तसेच जिथे मोकळी जागा मिळेल तेथे पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात़