महिला अधिकाऱ्याचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपालांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:34 AM2021-09-22T04:34:19+5:302021-09-22T04:34:19+5:30
निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय विभागात सहाय्यक कुलसचिव या पदावर हेमलता ठाकरे या महिला ...
निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय विभागात सहाय्यक कुलसचिव या पदावर हेमलता ठाकरे या महिला अधिकाऱ्याला पदस्थापना दिली. मात्र, त्यांना पदभार दिला नाही. तसेच केबिन व बसायला खुर्ची-टेबलदेखील दिलेली नाही. या अजब धोरणामुळे या महिला अधिकाऱ्याला आपल्या कार्यालयात एक महिन्यापासून घरूनच सतरंजी आणून सतरंजी फरशीवर टाकून त्यावर बसून काम करावे लागत आहे. हेमलता ठाकरे या आदिवासी समाजातील महिला असून, त्यांना अशा प्रकारे अपमानजनक वागणूक देऊन प्रशासन त्यांना अपमान करत आहे. हेमलता ठाकरे या आदिवासी समाजातील महिलेला आपल्या अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्या व शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या विद्यापीठात अशा अपमानजनक वागणुकीबाबत आपण स्वतः लक्ष देऊन आपल्या स्तरावर चौकशी नेमावी. तसेच विद्यापीठात अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही माहितीसाठी रवाना करण्यात आली आहे.