मान्सूनचे मागील पावलांवर पाऊल
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: July 13, 2018 11:53 AM2018-07-13T11:53:48+5:302018-07-13T11:55:52+5:30
आतार्पयतची वाटचाल : मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात तुरळक, ‘लॉन्ग पिरीयड अॅव्हरेज’ समान
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या तीन वर्षातील सक्रीय मान्सूनची वाटचाल बघता यात बरेच साम्य दिसून येत आह़े केवळ कमी दाबाच्या पट्टय़ांचे क्षेत्र वगळता मान्सूनचे यंदाचेही मार्गक्रमण एकसारखेच असून त्याने मागील पावलांवर पाऊल टाकले असल्याचेच यातून दिसून येत आह़े
गेल्या तीन वर्षात मान्सूनची वाटचाल तारखांच्या तुलनेत केवळ एक ते दोन दिवसांच्या फरकाने झाली असल्याचे दिसून येत आह़े भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये मान्सून 31 मे रोजी केरळात दाखल झाला होता़ 9 जूनमध्ये तो महाराष्ट्रात दाखल झाला होता व 11 जूनर्पयत त्याने संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होत, त्यानंतर 18 जूनर्पयत त्याने संपूर्ण देश व्यापला होता़
2017 साली एक दिवस आधी म्हणजे 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता़ 10 जूनला तो महाराष्ट्रात दाखल होऊन 24 जूनर्पयत तो संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय झाला होता़ 19 जूलैला तो संपूर्ण देशात सक्रीय झाला होता़
यंदा 2018 मध्ये 29 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता़ 8 जून रोजी तो महाराष्ट्रात दाखल झाला व 24 जूनर्पयत त्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता़ त्याच प्रमाणे 29 जूनर्पयत मान्सून संपूर्ण देशात सक्रीय झाला होता़ 2017 सालीसुध्दा 24 जून रोजी त्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापले होत़े 2016 ते 2018 र्पयतची मान्सूनची वाटचाल एक ते दोन दिवसांच्या फरकाने जवळपास सारखीच होत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आह़े मान्सूनच्या वाटचालीत सातत्य असल्याने हवामान खात्याकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आह़े
मागील वर्षी दक्षिण-पश्चिम मान्सून 6 दिवस आधी
2017 सालच्या मान्सूनची वाटचाल बघितली असता, दक्षिण-पश्चिम मान्सून मागील वर्षी 14 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता़ सामान्य वेळेपेक्षा तब्बल 6 दिवस आधीच हा मान्सून पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकला होता़ 19 जुलैर्पयत तो संपूर्ण देशात सक्रीय झाला होता़ हा कालावधी सामान्य वेळेच्या 4 दिवस उशिरा होता़ त्याच प्रमाणे 2018 च्या मान्सूनचीसुध्दा वाटचाल काही दिवसांच्या फरकाने सारखीच राहिलेली आह़े
‘लॉन्ग पिरीयड अॅव्हरेज’ समान
2017 मध्ये महाराष्ट्राचा सरासरी एलपीए (लॉन्ग पिरीयड अॅव्हरेज) 102 टक्के इतका नोंदविण्यात आला होता़ महिना निहाय त्याची टक्केवारी जून 104 टक्के, जुलै 102 टक्के, ऑगस्ट 87 टक्के, सप्टेंबर 88 टक्के अशी राहिली होती़ 2018 मधील जून महिन्याचा एलपीए पाहिला असता त्याची टक्केवारी 105 असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े म्हणजे एलपीएच्या बाबतीतही साधारणत दोन्ही वर्षांमधील सुरुवात सारखीच झाली असल्याचे चित्र तृत दिसून येत आह़े
मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाचीच शक्यता
भारतीय हवामान विभागाकडून वर्तविलेल्या अंदाजानुसार 13 ते 15 जुलै दरम्यान, कोकणसह परिसरात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याच शक्यता आह़े
मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आह़े तसेच विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची अंदाज व्यक्त होत आह़े त्यामुळे मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आल़े2017 मध्ये एकूण 14 लो प्रेशर सिस्टीमची निर्मिती झाली होती़ त्यात, 1 डीप डिप्रेशन, 2 डिप्रेशन्स, 6 वेल मार्क लो प्रेशर एरिया व 5 लो प्रेशर एरियाचा समावेश होता़ त्यातुलनेत 2018 मध्ये अद्याप 4 क्षेत्रांवर लो प्रेशर एरिया (कमी दाबाचे क्षेत्र) निर्माण झाले असल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद आह़े
सर्वाधिक कमी दाबाचे क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात निर्माण झाले आह़े त्यामुळे विदर्भ व कोकण परिसरात मोठय़ा प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आह़े