एस.टी.वाहकाचे तिकीट मशीनच नेले चोरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 05:27 PM2019-03-18T17:27:32+5:302019-03-18T17:27:48+5:30
नंदुरबार : एस.टी.बसमधून वाहकाचे ३० हजार रुपये किंमतीचे तिकीट मशीनच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तोरणमाळ बसस्थानकात घडली. म्हसावद पोलिसात ...
नंदुरबार : एस.टी.बसमधून वाहकाचे ३० हजार रुपये किंमतीचे तिकीट मशीनच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तोरणमाळ बसस्थानकात घडली. म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा-तोरणमाळ (क्रमांक एमएच ०७ सी ७७४३) ही बस नियमित फेऱ्या मारते. १६ रोजी सायंकाळी देखील ही बस शहादाहून तोरणमाळला गेली. तोरणमाळला पोहचल्यावर बसमधील वयोवृद्ध प्रवाशास खाली उतरण्यास मदतीसाठी वाहक सुरेश तानाजी जाधव यांनी आपले तिकीट मशीन आसनवर ठेवले. वाहक जाधव पुन्हा बसमध्ये गेल्यावर त्यांना तिकीट मशीन चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी उतरलेल्या काही प्रवाशांना विचारणा केली परंतु उपयोग झाला नाही. स्वयंचलीत ३० हजार रुपये किंमतीचे हे मशीन होते. याबाबत वाहक सुरेश तानाजी जाधव यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.