पवन उर्जा प्रकल्पातून चोरी करणा:या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:39 PM2018-06-25T13:39:35+5:302018-06-25T13:39:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पवन उर्जा टॉवरमधून आर्थिग केबल चोरणा:या तिघांना 22 रोजी इंद्रीहट्टी, ता.नंदुरबार शिवारात सुझलॉन कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. तालुका पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 68 हजाराची केबल व टेम्पो असा एकुण दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
अटक केलेले तिघे नंदुरबारातील आहेत त्यात अल्ताफबेग मोहबतबेग मिङरा, रा.गाजीनगर, गफरान अब्दुला पिंजारी रा.गाजीनगर व अकिल शाह उस्मान शाह फकिर, रा.मन्यार चौक असे संशयीतांची नावे आहेत. पवन उर्जा प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणावर केबल चोरी होत आहे. त्यामुळे कंपनीने सुरक्षा यंत्रणा वाढविली आहे. तिघे संशयीत इंद्रीहट्टी शिवारातील टॉवर क्रमांक 356 मधून 68 हजार रुपयांची आर्थिग वायर चोरून नेत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली. सुरक्षा रक्षकांनी सापळा लावला असता तिघेजण टेम्पोमध्ये आर्थिग वायर घेवून जात असतांना दिसून आले. त्यांना ताब्यात घेवून तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत सुरक्षा अधिकारी पांडुरंग रामचंद्र मंडले यांनी फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध तालुका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक बागुल करीत आहे.