पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:34 AM2021-09-23T04:34:31+5:302021-09-23T04:34:31+5:30

नंदुरबार : महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यात सामान्यांसह दारिद्र्यात जगणाऱ्यांनाही झळ बसत आहे. ही महागाई नेमकी कशामुळे, ...

Stomach-filling fights; Why should I pay taxes? | पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

Next

नंदुरबार : महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यात सामान्यांसह दारिद्र्यात जगणाऱ्यांनाही झळ बसत आहे. ही महागाई नेमकी कशामुळे, असा प्रश्न खालपासून वरपर्यंतच्या वर्गाकडून विचारला जात आहे. यातून वस्तू त्याला व्हॅट, जीएसटी, सेल्स टॅक्स अशी उत्तरे समोर येत असून, सामान्यजनांच्या खिशाला लागणारी ही कात्री त्यांना आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यास अडचणीची ठरत आहे.

सन २०१७ - २०१८च्या जिल्हा आर्थिक समालोचनानुसार नंदुरबार जिल्ह्यात एकूण कर भरणा करणाऱ्या नागरिकांची संख्या ४ हजारांच्या घरात आहे. यात व्यापाऱ्यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात एक कोटीपेक्षा अधिक कर भरणा करणारे केवळ ९ जण असून, १० लाख ते १ कोटीपर्यंत कर भरणाऱ्यांची संख्या ८००च्या घरात आहे. यातून कोट्यवधी रुपयांचा टॅक्स वसूलही होतो. परंतु जिल्ह्यात किरकोळ वस्तूपासून मोठ्या वस्तूंपर्यंत टॅक्स देणारे हजारो नागरिक आहेत. दैनंदिन खरेदी - विक्रीच्या व्यवहारातून त्यांच्याकडून टॅक्स दिला जातो. यामुळे गरीब असो वा श्रीमंत त्याच्या खिशातून सरकार आपसूकच वस्तू विक्रीच्या माध्यमातून कर वसूल करत आहे.

सिक्युरिटी गार्ड : शहरातील विविध भागातील एटीएम, बँका, शासकीय कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून अनेक जण तुटपुंजा मानधनावर कार्यरत आहेत. या वेतनात त्यांचेही भागेनासे झाले आहे.

साफसफाई कामगार : नियमित स्वच्छता करणारे सफाई कामगारही महागाईमुळे त्रस्त आहेत. वेतन कमी असल्याने अनेक बाबीत कपात करुन त्यांचे काम भागत आहे.

सलून चालक : सलूनचालकांचे लाॅकडाऊनमुळे सर्वाधिक हाल झाले. यातून व्यवसाय सुरु करुन दैनंदिन व्यवहार सुरु असला तरी टॅक्स भरण्याएवढी रक्कम त्यांच्याकडेही नाही.

लॉन्ड्री चालक : सर्वच जण कपड्यांना इस्त्री करतात असे नाही. जे करतात त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांतून आमचा उदरनिर्वाह चालतो.

घर कामगार करणाऱ्या महिला : घरोघरी जाऊन घरगुती काम करीत असल्या तरी सर्वच ठिकाणी त्यांना काम मिळतेच असे नाही.

तीन चाकी रिक्षा चालक : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे भाडेवाढ करावी लागली आहे. यातून प्रवासी स्वत:ची वाहने वापरत असल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे.

चालक : रिक्षाचे भाडे मिळणे मुश्किल झाले आहे. दिवसभरात पेट्रोलचा खर्चही निघत नाही.

भाजीपाला विक्रेता : बाजार समितीतून भाजीपाला आणून त्याची विक्री करणे अडचणीचे ठरत आहे. खर्च वाढले आहेत. दर वाढवले तर ग्राहक येत नाहीत.

खाद्य पदार्थ विक्रेते : शहरातील विविध भागात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी दरवाढ केल्यानंतर ग्राहकांवर परिणाम झाला.

बाजाराचे गमक हे क्रय आणि विक्रय या दोन शब्दात आहे. एखाद्या माणसाची क्रय शक्ती अर्थात कमाई चांगली असल्यास तो काहीही खरेदी करु शकतो. त्याला महागाईची कोणतीही चिंता नाही. परंतु ज्याची कमावण्याची शक्ती अत्यंत क्षीण आहे. त्याला फटका बसणारच, ही स्थिती सगळीकडेच आहे. यातून सावरण्यासाठी नागरिकांनी स्वत:च्या खर्चावर बंधने ठेवल्यास अनेक अडचणी दूर होऊ शकतील.

-प्राचार्य डाॅ. डी. एस. पाटील, अर्थतज्ज्ञ

Web Title: Stomach-filling fights; Why should I pay taxes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.