शहाद्यात दगडफेक, पोलीस ठाण्यातून परतातनाचा प्रकार, वाहने व घराचे नुकसान
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: September 29, 2023 06:07 PM2023-09-29T18:07:19+5:302023-09-29T18:09:23+5:30
वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात
रमाकांत पाटील/नंदुरबार: भावना दुखावल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन घरी परतणाऱ्या महिलांवर कुकडेल परिसरात जमावाने हल्ला केला. यामुळे परिसरात दगडफेक होऊन तणाव निर्माण झाल्याची घटना शहाद्यात दुपारी घडली. यावेळी जमानाने काही वाहनांचे व घरांचे नुकसान केले आहे. वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शुक्रवारी शहाद्यात शोभायात्रा काढण्यात आली होती.यात्रा भवानीनगर परिसरातून जात असताना शोभायात्रेतील काहींनी भावना दुखाविणाऱ्या घोषणा दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत परिसरातील ३०० पेक्षा अधिक महिलांनी शहादा पोलीस ठाण्यात येऊन याबाबत कारवाईची मागणी करीत उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना निवेदन दिले. महिला घरी परत जात असताना अचानक हातात लाठ्या काठ्या व दगड घेऊन जमाव आला. महिलांना घेऊन जाणाऱ्या गाडीवर त्यांनी दगडफेक करून परिसरात दंगल सुरू केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे.
घटनेची माहिती होताच शहरातील इतर भागातही तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वाढीव बंदोबस्त तैनात केला आहे.