वाहतूक व्यवस्थेवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:27 PM2017-10-16T13:27:37+5:302017-10-16T13:27:49+5:30
ट्रॅव्हल्सचीही मनमानी : रेल्वे हाऊसफुल्ल तर एसटीच्या दरवाढीने प्रवासी हवालदिल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऐन सणासुदीच्या दिवसांमधील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नंदुरबार येथील खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून आता आडमुठीपणाची भूमिका घ्यायला सुरुवात झाली आह़े दिवाळीच्या दरम्यान भाडय़ात वाढ करुन प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात येत आह़े यामुळे इतर वाहतूक व्यवस्थेवरही ताण आला आह़े
दिवाळीच्या पर्वाला सुरुवात झाली आह़े त्यामुळे मोठय़ा संख्येने प्रवासी या दिवसांमध्ये ये-जा करीत असतात़ त्यामुळे साहजिकच दळणवळण व्यवस्थेवर मोठा बोजा पडताना दिसून येत आह़े त्यामुळे या दिवसांमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून भाडेवाढ करण्यात आली आह़े नंदुरबारातून पुणे, नाशिक व मुंबई या मार्गावर सर्वाधिक वाहतूक करण्यात येत असत़े त्यामुळे ऐरवी पाचशे ते सहाशे रुपये असलेले भाडे आता वाढवून बाराशे ते पंधराशे करण्यात आले आह़े त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना प्रवासासाठी मोठय़ा प्रमाणात खिसे खाली करावे लागत असल्याचे म्हटले जात आह़े
दिवाळीनिमित्त वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण जाणवत आह़े आधीच रेल्वे हाऊसफूल्ल आहेत तर एसटीनेही नुकतीच हंगामी भाडेवाढ केली आह़े त्यातच खाजगी ट्रॅव्हल्सकडूनही आता जास्तीचे भाडे आकारण्यात येत असल्याने प्रवासी कोंडीत सापडत असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे ग्राहकांना पर्याय नसल्याने नाईलाजाने एसटी तसेच खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आह़े प्रवासासाठी रेल्वे उत्तम माध्यम मानले जात असले तरी यात होणारी गर्दी प्रचंड आह़े
त्याच रेल्वे प्रशासनाकडून दिवाळीनिमित्त कुठलीही जादा गाडीची व्यवस्था करण्यात आली नसल्याने परिणामी आहे त्या रेल्वे गाडय़ांवरच अधिक भर पडत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांचे चांगलेच हाल होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून दिवाळीनिमित्त सोडण्यात येणा:या ट्रॅव्हल्सची बुकींग करुन देण्यात येत आह़े यात, दुप्पट भाडेवाढ करण्यात आली आह़े नंदुरबारातून नाशिकसाठी फार कमी ट्रॅव्हल्स जात असतात़ त्यामुळे याचाही फायदा घेऊन कंपन्यांकडून प्रवाशांची अडवणूक करण्यात येत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आल़े