नंदुरबारात दुसऱ्या रविवारीही कडकडीत बंद, सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 01:34 PM2020-07-20T13:34:28+5:302020-07-20T13:36:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादासह नंदुरबारात रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी दर रविवारी अशा ...

Strictly closed on the second Sunday in Nandurbar, dry everywhere | नंदुरबारात दुसऱ्या रविवारीही कडकडीत बंद, सर्वत्र शुकशुकाट

नंदुरबारात दुसऱ्या रविवारीही कडकडीत बंद, सर्वत्र शुकशुकाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादासह नंदुरबारात रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी दर रविवारी अशा प्रकारचा बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नंदुरबारात सलग दुसºया रविवारी तर शहाद्यातील बंद पहिलाच होता. निर्मणुष्य रस्त्यांवर बालकांकडून ठिकठिकाणी क्रिकेटचे सामने रंगले होते.
नंदुरबार व शहाद्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने या रुग्णांची साखळी खंडित करण्यासाठी बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नंदुरबारात गेल्या रविवारपासून बंद पाळण्यात येत आहे. तर शहाद्यात पहिलाच रविवार होता.
नंदुरबारात सकाळपासूनच कडकडीत बंद होता. अत्यावश्यक सेवेतील अर्थात दवाखाने, औषधी दुकाने उघडी होती. इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्वच भागात शुकशुकाट दिसून येत होता. नागरिकांनी देखील बंदला चांगला प्रतिसाद दिला. सकाळी नऊ वाजेच्या आत काही दुकाने उघडण्यात आली होती. नागरिकांनी त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी गर्दी केली.
नऊ वाजेपासून अशी दुकानेही बंद करण्यात आली. पेट्रोल पंप देखील सकाळी नऊ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात अलाी. दिवसभर पंप देखील बंद करण्यात आले होते.
रस्त्यांवर व चौकाचौकात शुकशुकाट असल्याने अनेक ठिकाणी लहान बालकांकडून क्रिकेट खेळले जात होते. काही ठिकाणी पोलिसांनी हटकले तर काही ठिकाणी दुर्लक्ष केले. चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अशा प्रकारच्या बंदला नागरिकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. त्या आवाहनाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सलग दुसºया रविवारी बंद यशस्वी झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Strictly closed on the second Sunday in Nandurbar, dry everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.