रस्त्याअभावी विद्यार्थी बससेवा बंद :तळोदा-अमोनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 03:14 PM2018-08-05T15:14:54+5:302018-08-05T15:15:04+5:30

तळोदा-अमोनी : शैक्षणिक नुकसान; खाजगी वाहनांचा आधार; प्रशासनाचे दुर्लक्ष

Student bus service shut for lack of roads: Taloda-Amoni | रस्त्याअभावी विद्यार्थी बससेवा बंद :तळोदा-अमोनी

रस्त्याअभावी विद्यार्थी बससेवा बंद :तळोदा-अमोनी

Next

तळोदा : तळोदा-अमोनी ही विस्थापितांसाठी सुरू केलेली बस अरुंद रस्त्याचे कारण दाखवत गेल्या महिनाभरापासून बंद करण्यात             आली आहे. त्यामुळे शालेय विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या विस्थापितांनाही खाजग वाहनातून महागडा प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता आता चांगला झाला आहे. तसेच या बसचा मार्ग बदलून तो तळोदा ते कालीबेल       असा करून ही बसफेरी तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापित गावांसाठी अक्कलकुवा आगाराने तळोदा-अमोनी ही बस सेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरू केली होती. साहजिकच या बसमधून साधारण 150 शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तळोद्याला येण्यासाठी प्रवास करीत असतात. त्याच बरोबर तेथील नागरीकही या बसमध्येच बाजारहाट व इतर कार्यालयीन कामकाजासाठी तळोद्याला येत असतात. परंतु अरूंद रस्त्याचे किरकोळ कारण दाखवत संबंधित आगार प्रमुखाने गेल्या महिनाभरापासून ही बससेवा बंद केली आहे. त्यामुळे अमोनी, रेवानगर, नर्मदानगर, सरदारनगर, राजविहीर आदी ठिकाणाहून तळोद्याला शालेय व महाविद्यालयात शिकायला येणा:या 150 विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना नाईलाजास्तव खाजगी वाहनातून महागडा प्रवास करावा लागत आहे. या उपरांतरही वाहनधारक गाडीमध्ये प्रवाशांना कोंबडय़ासारखे कोंबून आणत असल्यामुळे नाईलाजास्तव धोकादायक प्रवास करावा लागत असल्याची विद्याथ्र्याची व्यथा आहे.
वास्तविक या मार्गाची डागडूजी झाली आहे. शिवाय रस्ता अरूददेखील झाला आहे. त्यामुळे सहन बस जावू शकते, अशी वस्तुस्थिती असतांना अजूनपावेतो संबंधित विभागाने ही बससेवा सुरू करण्याबाबत उदासिन धोरण घेतले आहे. रस्त्याच्या स्थितीची चौकशी करून बस सुरू करावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर या बसचा सद्याचा मार्ग बदलून तो तळोदा, दलेलपूर, रेवानगर, रानमहू, अमोनी, कालीबेल असा करावा. कारण हा मार्ग प्रवाशांना उलटा पडतो. रेवानगरकडे येण्यासाठी 20 किलोमीटर फिरून यावे लागते. शिवाय अतिरिक्त भाडेदेखील             द्यावे लागत असते. साहजिकच प्रवाशांनाही नाहक आर्थिक भरुदड सोसावा लागतोच. त्यात वेळही            वाया जात असतो. त्यामुळे या           मार्गाने ही बससेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य नाथा पावरा,          उपसरपंच दाज्या पावरा, इंदास पावरा, अनिल पावरा सचिन पावरा, लेह:या पावरा, दिगंबर पावरा यांनी केली आहे. दरम्यान तळोदा येथील बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक जयसिंग वळवी यांनी निवेदन स्विकारून सदर बस फेरी सुरू करण्यासाठी अक्कलकुवा आगारप्रमुखांकडे ताबडतोब पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
 

Web Title: Student bus service shut for lack of roads: Taloda-Amoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.