जिल्ह्यातील 39 महाविद्यालयांमध्ये रंगणार विद्यार्थी परिषद निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:47 PM2019-08-04T13:47:15+5:302019-08-04T13:47:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासनाने महाविद्यालयीन निवडणूकांवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविद्यालयांमध्ये पुन्हा ‘राजकारण’ रंगणार आह़े या निवडणूकांचा ...

Student council elections to be held in 39 colleges | जिल्ह्यातील 39 महाविद्यालयांमध्ये रंगणार विद्यार्थी परिषद निवडणूक

जिल्ह्यातील 39 महाविद्यालयांमध्ये रंगणार विद्यार्थी परिषद निवडणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासनाने महाविद्यालयीन निवडणूकांवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविद्यालयांमध्ये पुन्हा ‘राजकारण’ रंगणार आह़े या निवडणूकांचा निवड कार्यक्रम जाहिर झाला असून नंदुरबार जिल्ह्यातील 39 नियमित महाविद्यालयातील 18 हजार युवक-युवती विद्यार्थी प्रतिनिधींची प्रत्यक्ष निवड करणार आहेत़ 
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने बुधवारी विद्यार्थी परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आह़े यानुसार 23 ऑगस्ट रोजी महाविद्यालयांनी निवडणूक अधिसूचना आणि त्यासोबत नमुने प्रसिद्ध करावयाचे आहेत़ 24 ऑगस्ट रोजी मागासवर्ग प्रतिनिधी आरक्षण सोडत घेणे, त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजेनंतर तुकडीनिहाय तात्पुरती मतदार यादी जाहिर करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत़  यादीवर विद्याथ्र्याना 26 ऑगस्टर्पयत आक्षेप नोंदवता येणार आह़े 27 ऑगस्ट रोजी निवडणूक निर्णय अधिका:यांची यादी घोषित करणे आणि 29 रोजी सकाळी 11 ते 5 या दरम्यान विद्याथ्र्याना नामनिर्देशन दाखल करता येणार आह़े अवघ्या 10 दिवसांच्या या कार्यक्रमात 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दाखल अर्जाची छाननी होणार आह़े अर्ज अवैध ठरल्यास 3 सप्टेंबर रोजी विद्यार्थी उमेदवार हरकत दाखल करु शकतील व 4 सप्टेंबर रोजी त्यावर सुनावणी होऊन निर्णय दिला जाणार आह़े यातून त्याच दिवशी सायंकाळी अंतिम नामनिर्देशन यादी प्रसिद्ध करुन माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल़ यानंतर एक दिवस प्रचारासाठी देत 7 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आह़े चार तासांर्पयतच चालणा:या या मतदान प्रक्रियेनंतर त्याच दिवशी निकालही जाहिर केले जाणार आहेत़ विद्यापीठाने अत्यंत ‘एक्सप्रेस’ निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याने इच्छुकांची धावपळ होणार आह़े विद्यार्थी दशेत नेतृत्व गुण असलेल्या अनेकांच्या इच्छांना या निवडणूकीमुळे घुमारे फुटणार असून ही प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी महाविद्यालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आह़े 

पक्ष विरहित असलेल्या या निवडणूकीत चिन्हाबाबत माहिती देण्यात आलेली नाही़ दरम्यान ही निवडणूक पार पडल्यावर ‘लोकशाही’ पद्धतीनेच विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूकही होणार आह़े 9 सप्टेंबर रोजी विद्यापीठ अधीसूचना काढून कार्यक्रमास प्रारंभ करेल, महाविद्यालयात निवडून आलेले प्रतिनिधी 23 सप्टेंबर रोजी विद्यापीठ परिषदेसाठी मतदान करणार आहेत़ 
 

Web Title: Student council elections to be held in 39 colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.