पर्यावरण संवर्धनात योगदान देण्याचा विद्यार्थ्यांकडून प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:53 PM2020-01-11T12:53:02+5:302020-01-11T12:53:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे व त्यांच्यातील संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी सुरवाणी येथे विज्ञान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे व त्यांच्यातील संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी सुरवाणी येथे विज्ञान प्रदर्शन भरविले. यात एकुण ४७ उपकरणे मांडण्यात आली असून बहुतांश उपकरणे ही पर्यावरणपूरक होती. यावरुन या विद्यार्थ्यांनी संवर्धनात योगदान देण्याचा प्रयत्न केला.
धडगाव पंचाायत समिती व तालुका मुख्याध्यापक संघामार्फत हे प्रदर्शन भरविण्यात आले. या यावेळी गटशिक्षणाधिकारी जे.ए. चौरे, मुख्याध्यापक एन. जे.गोस्वामी, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष के.जी.पाठक, प्रविण बोरसे, बी.के.महिरे, नगिन पाटील, उमा पाडवी, श्रीमती पानपाटील, डी.बी.तडवी आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात ४७ विद्यार्थ्यांकडून उपकरणे मांडण्यात आली होती. त्यातून पहिली ते पाचवीच्या गटात प्रथम हर्षदा पावरा व सानिया मनियार, द्वितीय अजिंक्य वळवी व योगेश पावरा, तृतीय कलेश्वरी पाडवी व शुभांगी तडवी, उत्तेजनार्थ म्हणून ललिता वळवी व बिसा वळवी यांना बक्षिस देण्यात आले.
सहावी ते आठवीच्या गटात प्रथम मनिषा पावार, प्रमिला पावरा, मोगी पावरा व प्रतिक्षा पावरा यांच्या ज्वालामुखीचा उद्रेक या उपकणाला देण्यात आले. द्वितीय ऋषाली शिवदे व प्रिती शिंपी, तृतीय रमिला वळवी व अर्चना तडवी तर उत्तेजनार्थ म्हणून कृतिका जाधव व अविष्कार बनसोडे यांना बक्षीस देण्यात आले.
नववी ते १२ वीच्या गटात प्रथम राहुल पावरा व स्वप्निल परमार, द्वितीय हर्षल पावरा, धुरसिंग वळवी व रवींद्र पावरा, तृतीय रवींद्र पावरा तर उत्तेजनार्थ म्हणून कांतिलाल पावार व कांतिलाल तडवी यांना बक्षिस देण्यात आले. आदिवासी राखीवच्या प्राथमिक गटात मंगला नाईक व बेबी वळवी तर माध्यमिक गटातून आंबिलाल पावरा व मगन वळवी यांना प्रथम बक्षिस देण्यात आले.
शिक्षक गटातून केशव पावरा यांना प्रथम तर द्वितीय बक्षिस संदीप रोकडे यांना देण्यात आले. लोकसंख्या शिक्षणात भरतसिंग पवार यांच्या ‘व्यसनांचा विळखा-मृत्यूवाचून नाही सुटका’ या व्यसनमुक्तीतून सुटकेसाठी योगदान देणाऱ्या प्रकल्पाला देण्यात आले.