शिष्यवृत्तीसाठी विद्याथ्र्याचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:58 AM2017-09-09T11:58:44+5:302017-09-09T11:58:52+5:30
तळोदा प्रकल्प कार्यालय : शिष्यवृत्तीसाठी मिळण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : दोन वर्षापासून रखडलेली शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी शुक्रवारी तळोदा येथील प्रकल्प कार्यालयात विद्याथ्र्याकडून मोर्चा काढण्यात आला़ यात, तळोदा व धडगाव येथील शेकडो विद्याथ्र्यानी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता़ प्रांताधिकारी यांनी 15 सप्टेंबर्पयत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल़े
शासनाने आदिवासी विद्याथ्र्याना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना 2012 सुरु केली आह़े ही शिष्यवृत्ती शासनाच्याच आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येत़े शालेय विद्याथ्र्यापासून तर महाविद्यालयीन शिक्षण घेणा:या आदिवासी मुलामुलींना ही शिष्यवृत्ती दिली जात असत़े परंतु गेल्या दोन वर्षापासून आदिवासी विकास प्रकल्पाने विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती थकविली आह़े वास्तविक शाळा, महाविद्यालयांमधून विद्याथ्र्याचे दोन्ही वर्षाचे प्रस्ताव प्रकल्पाकडे दाखल करण्यात आले आह़े असे असताना अजूनही विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही़ या प्रकरणी विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही़ विद्याथ्र्यानी विविध संघटनांच्या माध्यमातून प्रकल्प कार्यालयाकडे पाठपुरावा केला आह़े
शिवाय शाळा महाविद्यालयांनीसुध्दा याबाबत वारंवार माहिती जाणून घेतली आह़े तरीही प्रकल्प कार्यालयामार्फत तांत्रिक अडचणींच्या नावावर अजूनही कार्यवाही सुरुच असल्याचा आरोप विद्याथ्र्याकडून करण्यात आला आह़ेया बाबींकडे प्रकल्पातील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचेही विद्याथ्र्याकडून सांगण्यात आल़े त्यामुळे काहीच होत नसल्याने संतप्त धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील विद्याथ्र्यानी शुक्रवारी प्रकल्प कार्यालयावर प्रचंड संख्येने मार्चा काढला़ त्या वेळी येथे उपस्थित असलेल्या अधिका:यांना चांगलेच धारेवर धरण्यात आल़े या वेळी विद्याथ्र्यानी शिष्यवृत्ती अभावी गणवेश, शैक्षणिक साहित्ये घेता येत नाही़ त्यामुळे नाईलाजास्तव गुजरामतमध्ये स्थलांतर करावे लागत आह़े तक्रारी करुनही प्रकल्प कार्यालय लक्ष देत नाही़ साहजिक आदिवासींसाठी शासनाचे प्रकल्प कार्यालय हे बोलाचाच भात आणि बोलालचीच कढी ठरत असल्याचे दिसून येत आह़े
सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी व विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत यांनी विद्याथ्र्याची समजूत काढली़ शिष्यवृत्ती व इतर समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची हमीदेखील दिली़ मात्र विद्यार्थी आपल्या निर्णयावर ठाम होत़े गेल्या चार-पाच तासापासून प्रकल्प कार्यालयासमोरच ठिय्या मांडला होता़ जोर्पयत प्रकल्पधिकारी स्वता आम्हाला भेटत नाही तोवर येथून हलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला़ प्रकल्पाधिकारी निमा अरोरा या शुक्रवारी नंदुरबारात होत्या़ त्या साडेपाच वाजता प्रकल्प कार्यालयात आल्या़