नंदुरबारमध्ये विद्यार्थी सुविधा केंद्र
By admin | Published: July 8, 2017 05:03 PM2017-07-08T17:03:50+5:302017-07-08T17:03:50+5:30
विद्यापीठाशी संबधीत सर्वच कामे आता स्थानिक ठिकाणीच होतील
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.8 - विद्यापीठाशी संबधीत सर्वच कामे आता स्थानिक ठिकाणीच होतील, त्यासाठी विद्यापीठात येण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील यांनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.
विद्यार्थी सुविधा केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या हस्ते सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना कुलगुरु डॉ.पाटील म्हणाले, धुळे, जळगाव, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील विद्याथ्र्याची गैरसोय टाळण्यासाठी फैजपूर, चाळीसगाव, शहादा, नंदुरबार, अमळनेर आणि धुळे या सहा ठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्र उघडण्यात येणार आहे. यातील पहिल्या केंद्राचे उद्घाटन आज नंदुरबारात एकलव्य प्रशिक्षण केंद्रात करण्यात येत आहे.
विद्याथ्र्याना अनेकदा गुणपत्रक, श्रेणीसुधार, परीक्षा, पात्रता आदी विविध कामांसाठी विद्यापीठात यावे लागते. यामुळे विद्याथ्र्याना आर्थिक भरुदडही सहन करावा लागतो. ही विद्याथ्र्याची गैरसोय व आर्थिक ताण टाळण्यासाठी हे सुविधा केंद्र एमकेसीएलच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे.
या सुविधा केंद्रात एमकेसीएलचा प्रतिनिधी पुर्णवेळ कार्यरत राहील. उर्वरित पाच विद्यार्थी सुविधा केंद्राचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.एम.कलशेट्टी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी आमदार अॅड.पद्माकर वळवी, डॉ.नरेंद्र पाडवी, माजी सनदी अधिकारी अ.ध.वसावे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, डॉ.कांतिलाल टाटीया, डॉ.सुहास नटावदकर, पिरेसिंग पाडवी, भगतसिंग पाडवी, प्राचार्य एच.एम.पाटील, डॉ.डी.एस.पाटील, डॉ.भरत वळवी, डॉ.गजानन डांगे, डॉ.राजेंद्र दहातोंडे, डॉ.शांताराम बडगुजर, कार्यकारी अभियंता सी.टी.पाटील, ए.एन.गोसावी, केंद्राचे नियंत्रण अधिकारी डॉ.सी.पी.सावंत, वसंत वळवी, गोकुळ पाटील, शिरिष बव्रे, भिमसिंग वळवी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आदी उपस्थित होते.
यावेळी नियोजित आदिवासी अकादमीच्या 25 एकर जागेवर उपस्थितांच्या हस्ते 57 वृक्षांची लागवड करण्यात आली.