उघडय़ा रोहित्रामुळे विद्यार्थी असुरक्षित : कोठार आश्रमशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:56 AM2018-09-06T11:56:38+5:302018-09-06T11:56:44+5:30
महावितरण अभियंत्यांना निवेदन
कोठार : तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या जवळ असणारी विद्युत रोहित्र विद्याथ्र्यासाठी धोकादायक ठरत आहे. रोहित्राचे इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शाळा व्यवस्थापनाकडून होत आहे.
सातपुडय़ाच्या पायथ्याशी असणा:या तळोदा तालुक्यातील कोठार येथे मागील 25 वर्षापासून अनुदानित आश्रमशाळा सुरु आहे. या शाळेत सुमारे आठशे विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेतात. गावात सुरुवातीलाच मुख्य रस्त्यालगत ही आश्रमशाळा आहे. गावाला वीज पुरवठा करण्यासाठी गावात प्रवेश करणा:या मुख्य रस्त्याच्या लगतच विद्युत वितरण कंपनीकडून रोहित्र अर्थात डीपी बसविण्यात आली आहे.परंतु ज्या ठिकाणी हे विद्युत रोहित्र बसविण्यात आले आहे ती जागा गैरसोयीची आह़े आश्रमशाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच जनावरांसाठीदेखील धोकेदायक ठरणारी आहे. या रोहित्रामध्ये व शाळेच्या आवारात केवळ एक संरक्षक भिंतीचे अंतर आहे. या भिंतीला लागूनच विद्याथ्र्याची पाणी व कपडे धुण्याची सोय आहे.
गावात प्रवेश करणा:या मुख्य रस्त्याला लगत हे विद्युत रोहित्र आहे.या रस्त्यावर व रोहित्राच्या परिसरात दिवसभर विद्यार्थी, ग्रामस्थ, वाहने व शेतशिवारात विविध कामानिमित्त ये-जा करणा:या जनावरांची वर्दळ असते. ह्या विद्युत रोहित्रावरील फ्यूजपेटीचा दरवाजा अनेकदा उघडा असण्याचे दिसून आले आहे. कळत-नकळत रस्त्यावरून जाणा:या व्यक्ती किंवा प्राण्याचा स्पर्श झाला तर अनुचित प्रकार घडू शकतो. शिवाय गावात प्रवेश करणारा रस्ता हा चढावावरील असल्याने या रस्त्यावरून गावात जाणारी दुचाकी व चारचाकी वाहने ही वेगात चढत असतात.अश्या परिस्थिती वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट रोहित्रावर देखील आदळून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे हे रोहित्र गावातील मोकळ्या जागेत किंवा इतरत्र स्थलांतर करावे अशी मागणी मागील दोन वर्षापासून शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.परंतु याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांचे दुर्लक्ष होत आह़े सलसाडी ता.तळोदा येथे वीजेचा धक्का लावून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शाळा व्यवस्थापनाकडून हे विद्युत रोहित्र इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अश्या मागणीचे पत्र बोरद व तळोदा अश्या दोन्ही कार्यालयातील वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना देण्यात आले आहे. भविष्यात कोणत्याची प्रकारची अप्रिय घटना घडू नये यासाठी वीज वितरण कंपनीने याकडे कानाडोळा न करता तात्काळ आश्रमशाळेलगत असणारे हे विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी योग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे.