रिक्त जागांमुळे विद्याथ्र्याची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:42 AM2017-09-07T11:42:24+5:302017-09-07T11:42:24+5:30

तळोदा तालुक्याची स्थिती : 469 पैकी 73 शिक्षकांची पदे रिक्त

 Students' education due to vacant seats | रिक्त जागांमुळे विद्याथ्र्याची परवड

रिक्त जागांमुळे विद्याथ्र्याची परवड

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील 94 गावांमध्ये जिल्हा परिषदेचय एकूण 137 शाळा आहेत़ त्यात शिक्षकांच्या 469 मंजुर जागांपैकी तब्बल 73 जागा रिक्त असल्याने विद्याथ्र्याचे नुकसान होत आह़े 
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जिल्हाभरात विविध तालुक्यात मोठय़ा संख्येने शिक्षकांची पदे रिक्त आहेत़ त्यात तळोदा तालुक्याची स्थिती भिषण आह़े एकीकडे शिक्षकांची पदे भरली जात नसल्याने दुसरीकडे विद्याथ्र्याची शैक्षणिक नुकसान होत असल्याची स्थिती कायम आह़े त्यामुळे पालकांकडूनही मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त होत आह़े  तालुक्यातील दुर्गम भागातील विद्याथ्र्याना शिक्षणासाठी सरकारी शाळांचाच आधार असतो़  खाजगी शाळांमध्ये तसेच मोठी परीक्षा फी भरु न शकरणा:या विद्याथ्र्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद तसेच नगरपालिका अशा शासकीय शाळांची नितांत आवश्यकता असत़े परंतु मुळात तालुक्यात शिक्षकांचीच पदे इतक्या मोठय़ा संख्येने रिक्त असतील तर शिक्षणाची गंगा दुर्गम भागात कशी पोहचनार असा प्रश्न निर्माण होत आह़े 
दरम्यान, तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठय़ संख्येने रिक्त जागा असल्याने याचा परिणाम म्हणून इतर शिक्षकांना चार ते पाच वर्गाचा भार सहन करावा लागत आह़े यामुळे विद्याथ्र्याना शिक्षण देताना त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आह़े तालुक्यातील 137 जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येक वर्गाला किमान एका शिक्षकाची आवश्यकता आह़े परंतु शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे इतर शिक्षकांवर कामाचा बोजा पडत आह़े त्यामुळे विद्याथ्र्याना शिकवीतांना त्यांना अनेक ताण-तणावांचा सामना करावा लागत आह़े याचा परिणाम विद्याथ्र्याच्या शिक्षणावर होत असल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान, तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी शिक्षण सभापती शांतीबाई पवार, उपसभापती दीपक मोरे यांच्याकडे आपले ग:हाणे मांडल़े व शिक्षक भरती करण्याबाबत ठराव मांडून तो मुंख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आवाहन त्यांना करण्यात आल़े 
गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांची पदे रिक्त आह़े शासनाकडून शिक्षक भरतीदेखील घेण्यात येत नसल्याने समस्यांचे ग्रहण कधी सुटणार अशी चिंता आता पालकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े तालुक्यासह जिल्ह्यातदेखील हीच समस्या असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आह़े 
दरम्यान, निदान सातपुडा परिसरातील दुर्गम भागात तरी शिक्षकांची सोय करुन द्यावी अशी मागणी पालकांकडून जोर धरु लागली आह़े दुर्गम भागात शिक्षणाचा प्रश्न गंभीर आह़े त्यामुळे इतर तालुक्यांच्या तुलणेत तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणायचा असेल तर शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आह़े

Web Title:  Students' education due to vacant seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.