‘एज्युकेशनल कार्निवल’मध्ये रमले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:14 PM2020-01-24T12:14:05+5:302020-01-24T12:14:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील एस़ए़मिशन ट्रस्टच्या इंग्लिश मेडियम प्राथमिक व हायस्कूल, मराठी हायस्कूल तसेच संस्थेंतर्गत येणाऱ्या विविध ...

Students engaged in 'Educational Carnival' | ‘एज्युकेशनल कार्निवल’मध्ये रमले विद्यार्थी

‘एज्युकेशनल कार्निवल’मध्ये रमले विद्यार्थी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील एस़ए़मिशन ट्रस्टच्या इंग्लिश मेडियम प्राथमिक व हायस्कूल, मराठी हायस्कूल तसेच संस्थेंतर्गत येणाऱ्या विविध शाळांच्या एज्युकेशनल कार्निवलचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले़ यावेळी आनंद मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत जल्लोष केला़
उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्याहस्ते करण्यात आले़ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड़ राम रघुवंशी, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ़ राजेश वळवी, आदिवासी देवमोगरा संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, प्राचार्या नूतनवर्षा वळवी, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील, सचिव कुंदन सोनवणे, महेंद्र फटकाळ, संस्थेचे चेअरमन रेव्हरंड जे़एच़पठारे, व्हाईस चेअरमन संतोष देशपांडे, रेव्हरंड आरक़े़वळवी, रेव्हरंड अनुप वळवी, समर नाथाणी, इंग्लिश मेडियमच्या मुख्याध्यापिका सुनिता अहिरे, मुख्याध्यापक संदेश यंगड उपस्थित होते़
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते एज्युकेशन फेअर आणि कार्निवल २०२० चे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ़ वळवी यांनी १०८ वर्षांपासून जिल्ह्यात शिक्षण प्रसार करणाºया एस़ए़मिशन ट्रस्टची माहिती दिली़ प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी चढाओढीच्या जीवनात माणूस माणूसपण विसरत चालला आहे़ अहंमपणात न राहता चांगल्या विचारांचे रोपण करण्याची गरज आहे़ विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले विचार रुजवून त्यांचा विकास करणे गरजेचे असल्याचे सांगितले़
उद्घाटनानंतर ज्युनियर, सिनियर के़जी तसेच इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले़ यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सुषमा कालू, डॉ़ मधुकमल हिवाळे, सॅबस्टिन जयकर, व्ही़आऱपवार, वंदना जांबिलसा आदी परिश्रम घेत आहेत़

Web Title: Students engaged in 'Educational Carnival'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.