नंदुरबारमध्ये विद्यार्थी गिरवताय पुस्तकाविनाच धडे
By admin | Published: June 30, 2017 03:22 PM2017-06-30T15:22:00+5:302017-06-30T15:22:00+5:30
नववी इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा तुटवडा. पालकांची पायपीट
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.30 - नववी इयत्तेच्या इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा जिल्ह्यात तुटवडा असल्याचे पुस्तक विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आह़े यामुळे पुस्तके मिळवण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकही त्रस्त झाले आह़े परंतु याबाबत नाशिक येथील महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक भांडार व वितरण केंद्राचे डेपो मॅनेजर लक्ष्मण डामसे यांनी याचे खंडन केले आह़े पुस्तके मागणीनुसार किंबहुना अधिक देण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़े
शाळा सुरु होऊन 15 दिवस झाले आहेत. मात्र नववीच्या इंग्रजी माध्यमातील विद्याथ्र्याना पुस्तके मिळत नसल्याचे पालक व पुस्तक विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आह़े राज्य पाठय़पुस्तक भांडार व वितरण केंद्राकडून पुस्तकांचे वितरण करण्यात येत नसल्याचा आरोप पुस्तक विक्रेत्यांकडून करण्यात येत आह़े जिल्ह्यात केवळ एकाच पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित माध्यमाची पुस्तके विक्रीचा परवाना आह़े त्यामुळे त्यांना नववीच्या इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा पुरवठा करण्यात येत असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आह़े
एका विषयाची केवळ 50 ते 60 पुस्तकांचा पुरवठा होत असल्याचे सांगण्यात आल़े त्यामुळे हजारोंच्या संख्येने असलेले विद्याथ्र्याना नगन्य पुस्तकांचा पुरवठा होत असल्याने पालकांसह शिक्षकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े