‘साक्षर’ गावासाठी विद्याथ्र्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:49 PM2018-09-18T12:49:28+5:302018-09-18T12:49:33+5:30
शुभ वर्तमान : तलावडी येथे तळोदा समाजकार्य महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम
नंदुरबार : निरक्षरपणामुळे येणा:या अडचणींवर मात करण्यात असमर्थ ठरणा:या ग्रामस्थांच्या मदतीला आता विद्यार्थी धावून जात आहेत़ यांतर्गत तलावडी ता़ तळोदा येथे समाजकार्य महाविद्यालयाच्या 8 विद्याथ्र्यानी ‘माहिती व मदत केंद्र’ सुरु केले आह़े केंद्राद्वारे ग्रामस्थांना सवतोपरी मदत करण्यात येत आह़े
तळोदा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावडी येथे लिहिण्या-वाचण्यापुरतं ज्ञान असलेल्या ग्रामस्थांची संख्या अधिक आह़े यामुळे शासकीय योजना, बँकेचे चलन, मुलांच्या शिक्षणाचे अर्ज भरणे, प्रशासनार्पयत समस्या मांडणे याबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागत होत़े 700 लोकसंख्या असलेल्या या गावाचा समावेश काजीपूर ग्रुप ग्रामपंचायतीत होत असल्याने गाव तसे वा:यावर होत़े शहरापासून जवळ असल्याचा कोणताही लाभ मिळत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती़ गावातील या समस्यांची माहिती तळोदा शहरातील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना मिळाली होती़ महाविद्यालयाच्या विद्याथ्र्याना वर्षभरात क्षेत्रकार्य विषयांतर्गत गाव दत्तक घेण्याची तरतूद असल्याने त्यांनी महाविद्यालयाने सूचित केलेल्या गावापेक्षा तलावडी हे गाव दत्तक देण्याची विनंती महाविद्यालय आणि विद्यापीठाकडे केली होती़ यानुसार गेल्या दोन महिन्यापासून हे गाव दत्तक घेतले गेले होत़े गाव दत्तक घेतल्यानंतर कविता चौधरी, शुभांगी खरताडे, रोशना पाडवी, रमेश वळवी, सुरेश पवार, निलेश गिरासे, गिरधर वसावे, विपुल वसावे, सुंदरसिंग वसावे, सुनील वसावे ह्या विद्यार्थी गटाने गावात भेट देत शेतकरी, युवक, युवती, किशोरवयीन युवती, महिला, वृद्ध महिला, पुरूष यांचे सव्रेक्षण करत त्यांचे गट तयार करून घेतले होत़े प्रत्येक गटाची जबाबदारी आठही विद्याथ्र्यानी स्विकारून कामाला सुरूवात केली होती़ यांतर्गत ग्रामस्थांना शासकीय योजना, बँकांचे कजर्, शेतीविषयक माहिती तसेच विविध माहिती देऊन त्यांच्याकडून अजर्ही भरून घेण्यात आले होत़े तब्बल दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामाने आता बाळसे धरले असून ग्रामस्थांच्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या आहेत़ यात ब:याच जणांचे दाखल्यांचे अर्ज तयार करणे, दाखले मिळवण्यासाठी कागदपत्रांची माहिती, सुकन्या योजनेत नाव नोंदणी, घरकुलांच्या याद्यांमध्ये नाव नोंदवणे, बँकांमधून पैसे काढणे किंवा पैसे भरण्यासाठी स्लीप कशी भरावी याची माहिती घेणे, पासबुक भरून घेणे, विविध शासकीय योजनांची माहिती करून घेणे आदी कामे पूर्ण करण्यात आली आह़े ग्रामस्थांना पॅन कार्ड, उज्ज्वला गॅस योजना यांचा लाभ देण्यासह ई-प्रशासनात होणारी कामे विद्यार्थी निशुल्क करणार आहेत़
केवळ शासकीय योजनांवरच भर न देता महिलांसाठी चारही युवतींकडून मार्गदर्शन वर्ग घेण्यात येत आह़े यात वयात येणा:या युवतींना मासिक पाळी, गर्भवती मातांच्या मासिक तपासणी, महिलांचे विविध आजार यांची माहिती देण्यात येत़े गावात रोजगार नसल्याने बचत गटांच्या माध्यमातून कामे सुरू करण्याचा मानस या विद्याथ्र्याचा असून महाविद्यालयाचा अभ्यास आणि वेळ पाळून ते मदत केंद्रात हजेरी लावत आहेत़ यासाठी महाविद्यालय प्रशासनाकडून विद्याथ्र्याना सहकार्य करण्यात येत आह़े युवकांच्या या प्रयत्नाने गाव संपूर्ण साक्षर होण्यासाठी हातभार लागत असल्याची माहिती देण्यात आली आह़े