60 ठिकाणी सब-वे : नंदुरबार-सुरत अवघ्या दोन तासांचा होणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:30 PM2018-01-06T12:30:22+5:302018-01-06T12:30:29+5:30

Sub-Way in 60 places: Nandurbar-Surat will be just for two hours | 60 ठिकाणी सब-वे : नंदुरबार-सुरत अवघ्या दोन तासांचा होणार प्रवास

60 ठिकाणी सब-वे : नंदुरबार-सुरत अवघ्या दोन तासांचा होणार प्रवास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उधना-जळगाव रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाअंतर्गत 300 कि.मी.अंतरात तब्बल 60 सब वे काढण्यात आले असून यामुळे ही लाईन मुंबई परिमंडळात सर्वात सुरक्षित रेल्वे लाईन म्हणून ओळखली जाणार आहे. दरम्यान, उधना ते सुरत दरम्यान तिसरा रेल्वेमार्ग टाकला जाणार असल्यामुळे ताप्ती सेक्शनवरील रेल्वे गाडय़ांना होणारा 25 ते 30 मिनिटांचा उशीर आता कमी होणार आहे. 
उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे काम 75 टक्के पुर्ण झाले आहे. उधना ते नंदुरबार आणि जळगाव ते शिंदखेडा दरम्यानचे काम पुर्ण झाले आहे. आता शिंदखेडा ते नंदुरबार दरम्यानचे काम बाकी आहे. हे काम मार्च 2018 अखेर पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु सध्याची कामाची गती पहाता ते शक्य नसल्याची स्थिती आहे. 
सुरक्षीत मार्ग म्हणून ओळख
300 किलोमिटर अंतराच्या या मार्गावर तब्बल 60 सबवे काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा रेल्वे मार्ग सर्वात सुरक्षीत राहणार आहे. 60 सबवेंवर एकुण 60 कोटी अतिरिक्त खर्च आला आहे. या सबवे मुळे खाजगी वाहने आणि रेल्वे    यांच्यातील धडक किंवा मानवरहित रेल्वे फाटके ही बाब कालबाह्य ठरणार आहे. 
याशिवाय रेल्वे गाडय़ांची वर्दळीच्या वेळी त्यांना पासींगसाठी देखील सात वेगळे पूल तयार  करण्यात आले आहेत. सिगAलची अत्याधुनिक यंत्रणा देखील  कार्यान्वीत करण्यात येणार आहे. आरआरआय रिले रूट इंटरलॉकिंग याचा उपयोग त्यासाठी केला जाणार आहे. 
अर्धा ते पाऊण तास वाया
सध्या सुरत ते भुसावळ या प्रवासात अर्धा ते पाऊण तास वाया जात आहे. त्याला कारण सुरत ते उधना दरम्यान मुंबई लाईनवर गाडय़ांची वर्दळ आणि त्यांना पासिंगसाठी ताप्ती सेक्शनवरील गाडय़ांना थांबवून ठेवणे हे आहे. त्यामुळे किमान 25 ते 30 मिनिटे किंवा जास्तीत जास्त 45 मिनिटांचा वेळ वाया जातो. त्यामुळे एकतर गाडय़ा सुरत किंवा उधना स्थानकावर थांबून राहतात.
आता उधना ते सुरत या 19 कि.मी.च्या अंतरात तिसरी रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाडय़ा या तिस:या ट्रॅकवर वळविण्यात येणार असल्यामुळे  रहदारी सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
या रेल्वेंना होतो उशीर
सध्याच्या परिस्थितीत ताप्ती सेक्शनमधील ताप्ती-गंगा, अहमदाबाद-ईलाहाबाद, बडोदा-वाराणसी, महामना-मालदा टाऊन, ओखा-पूरी, अहमदाबाद-पूरी, हावडा, नवजीवन, बिकानेर-सिकंदराबाद, जोधपूर-चेन्नई, अहमदाबाद-यशवंतपूर, अजमेर-पूरी, पोरबंदर-हावडा, गांधीधाम-विशाखापट्टणम, राजकोट-रेवा, हापा-बिलासपूर, ओखा-रामेश्वरम,  अहमदाबाद-दरबंगा या एक्सप्रेस गाडय़ांचा समावेश   आहे. त्यांना सुरत स्थानकानंतर उधनामार्गे भुसावळ लाईनवर वळविण्यात येते. 
प्रत्येक गाडीला यामुळे सहाजिकच किमान अर्धातास उशीर होतो. आता टाकण्यात येणारी तिसरी लाईन ही सुरत रेल्वे स्थानकातील चौथ्या फ्लॅटफार्मवरून थेट उधना स्थानकाच्या भुसावळ रेल्वे लाईनर्पयत राहणार आहे त्यामुळे थेट पासींग होण्यास मदत होणार आहे.
 

Web Title: Sub-Way in 60 places: Nandurbar-Surat will be just for two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.