शहादा येथील जीएमसी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:36+5:302021-09-25T04:32:36+5:30
प्रथम वर्ष संगणक शाखेत अक्षय प्रकाश पाटील प्रथम, पाटील जिगीषा हेमराज द्वितीय व वंदन कांतीलाल पाटील तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण ...
प्रथम वर्ष संगणक शाखेत अक्षय प्रकाश पाटील प्रथम, पाटील जिगीषा हेमराज द्वितीय व वंदन कांतीलाल पाटील तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. विद्युत शाखेत रोहन हिरामण भोई, प्रमिला बंडू पावरा व विवेक प्रकाश मराठे हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. यांत्रिकी शाखेतून पार्थ संजय साठे प्रथम, कॅल्व्हरी रविकांत चोपडे द्वितीय, तर चैतन्य सुधाकर पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला. स्थापत्य शाखेतून प्रथम कुणाल रविकांत संजराय, द्वितीय जयेश मनीष चौधरी व तृतीय क्रमांक स्वप्नील संजय निकुम याने मिळविला.
द्वितीय वर्ष संगणक शाखेतून प्रथम दिव्या जगदीश पाटील, द्वितीय नम्रता मणिलाल पटेल, तर तृतीय क्रमांक वैष्णवी निंबा सूर्यवंशी हिने पटकावला. विद्युत शाखेत प्रसन्न हरीश लहाने, विलास भास्कर पाटील व चेतन शिवाजी घुगे हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. यांत्रिकी शाखेत ऋषिकेश सतीश चौधरी प्रथम, गणेश गुलाब पाडवी द्वितीय व तृतीय क्रमांक लतेश राकेश पाटील याने मिळविला. स्थापत्य शाखेतून अनिष्का शरद शुक्ला प्रथम, आलमगीर शेख द्वितीय, तर हिमांशू पाटील तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
तृतीय वर्ष संगणक शाखेत अपेक्षा प्रकाश पटेल, देवयानी भगवान देसले व तरुण किशोर पाटील यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. विद्युत शाखेत श्रुती कैलास चव्हाण प्रथम, पीयूष रवींद्र पाटील द्वितीय, तर कमलेश शांतीलाल पाटील हा तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. यांत्रिकी
शाखेत ओम निंबा सूर्यवंशी, मयूर संजय पाटील व मयूर योगेश पटेल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. स्थापत्य शाखेतून प्रथम जागृती सुरेश कोळी, द्वितीय सृष्टी प्रशांत वाघ व तृतीय क्रमांक खुशबू सोलंकी हिने पटकावला. संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, पी.आर. पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य बी.के. सोनी, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.