बॉयलर कोंबडीसाठी एका ग्रा.पं.ची अशीही परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:45 PM2020-04-23T12:45:56+5:302020-04-23T12:46:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात ...

Such permission of one G.P. for boiler chicken | बॉयलर कोंबडीसाठी एका ग्रा.पं.ची अशीही परवानगी

बॉयलर कोंबडीसाठी एका ग्रा.पं.ची अशीही परवानगी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी चक्क धुळे जिल्ह्यातून बॉयलर कोंबडी आणण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत परवानगी देण्यात येत असल्याचेसमोर आले आहे.
याबाबत असे की, सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच मुबंई-पुणे सारख्या शहरासह नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला असून, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्यासाठी आॅनलाइन पास घेणे तसेच तहसील, आर.टी. ओ यांच्याकडून परवानगी घेण्यासाठी साईटदेखील सुरू करण्यात आली आहे. परंतु परजिल्ह्यातून जीवनावश्यक वस्तू वाहतुकीसाठी चक्क ग्रामपंचायतमार्फत परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
प्रशासनामार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध प्रकारे खबरदारी करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आॅनलाइन नोंद होत असल्याने प्रशासनाकडे त्याची माहिती असते तरी ग्रामपंचायत जर इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देत असेल तर कोरोना विषाणू इतर जिल्ह्यात सहज प्रवेश करू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गाभीर्यपणे लक्ष देऊन परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनचालकाची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Such permission of one G.P. for boiler chicken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.