सावित्रीच्या लेकींची अशीही परवड
By Admin | Published: June 24, 2017 04:14 PM2017-06-24T16:14:11+5:302017-06-24T16:14:11+5:30
मानव विकास मिशन : नवापूर वगळता जिल्ह्यात सर्वत्र मोफत बससेवा नाहीच
संतोष सूर्यवंशी/ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.24- विविध शाळा महाविद्यालये सुरु झाली आहेत़ परंतु तरीदेखील मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थीनींसाठी असलेल्या मोफत बसेस अजून सुरु झाल्या नाहीत़ त्यामुळे पालक तसेच विद्यार्थीनींकडून नाराजीचा सुर व्यक्त होत आह़े दरम्यान जिल्ह्यातील एसटी आगार कार्यालयांशी संपर्क साधला असता, संबंधित गटशिक्षण अधिका:यांकडून याबाबत सूचना मिळाल्या नसल्याने बसेस सुरु करण्यात आल्या नसल्याचे सांगण्यात आल़े
महाराष्ट्र राज्य शासनाकडून औरंगाबाद येथील मानव विकास मिशनअंतर्गत 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थीनींना शिक्षण घेणे काहीसे सुखद व्हावे तसेच प्रवासाचा खर्च वाचावा यासाठी शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत बससेवा देण्यात येत असत़े याबाबत संबंधित तालुक्यातील गटविकास अधिका:यांकडून मानव विकास मिशन औरंगाबाद येथील कार्यालयाशी संपर्क साधणे अपेक्षीत असत़े त्यांनतर त्यांना किती बसेस आवश्यक आहेत़ कुठल्या मार्गावर त्यांच्या फे:या कराव्यात या बाबत माहिती देण्यात येत असत़े त्यानुसार मानव विकास मिशन कार्यालय संबंधित अगाराला बसेस उपलब्ध करुन देण्याचे आदेश देत असत़े
परंतु बसेसबाबत संबंधित गटविकास अधिका:यांकडून कुठलेही पाऊले उचलली जात नसल्याने परिणामी विद्याथ्र्याना शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आह़े शाळा, महाविद्यालये सुरु होऊन बरेच दिवस उलटून गेल्यावरही याबाबत कार्यवाही होत नसल्याने चिंता व्यक्त होत आह़े
अक्कलकुवा आगाराच्या आगार प्रमुख अनुजा दुसाने यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार अक्कलकुवा आगाराकडून एकूण 16 बसेस मानव विकास मिशनअंतर्गत मागील वर्षी देण्यात आल्या होत्या़ त्यात, 7 बसेस अक्कलकुवा, 7 बसेस तळोदा तर दोन बसेस मोलगी व लगतच्या मार्गावर देण्यात आल्या होत्या़ परंतु यंदा याबाबत कुठलीही प्रक्रिया अद्याप सुरु न झाल्याने तसेच योजनेबाबत कुठलाही संपर्क झाला नसल्याने यंदासाठी अजून बसेस सुरु करण्यात आलेल्या नाहीत़ अशी माहिती दुसाने यांनी दिली़ शहादा आगाराकडूनही शहादा व धडगावसाठी 7 मार्गावर 7 बसेस देण्यात येत असल्याची माहिती मिळाली परंतु आगाराकडूनही अजून मानव विकास मिशनअंतर्गत बससेवा सुरु झाली नसल्याचे सांगण्यात आल़े
महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थीनींना शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत बससेवा सुरु करण्यात यावी यासाठी औरंगाबाद येथील कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आह़े
-तेजराव गाडेकर
माध्यमिक शिक्षणाधिकारी
जि़प़ नंदुरबार