गावविकासाची अशी कहाणी दगडातून आले पाणी

By admin | Published: May 3, 2017 04:42 PM2017-05-03T16:42:32+5:302017-05-03T16:42:32+5:30

भगदरी गावाचे होतेय नंदनवन : लोकसहभागातून सुरू आहे विकासाची प्रक्रिया

Such a story of village development came out of the stone | गावविकासाची अशी कहाणी दगडातून आले पाणी

गावविकासाची अशी कहाणी दगडातून आले पाणी

Next

 ऑनलाईन लोकमत

मोलगी, जि.नंदुरबार-  विकासाची निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया अधिक वेगाने पुढे नेण्याची जबाबदारी ही लोकांची असते, यात वाढणारा सहभाग हा विकास घडवतो़, असाच लोकसहभाग आणि शासनाची मदत यातून विकासाला गती देण्याचे काम भगदरी गावात ग्रामस्थांनी सुरू केले आह़े द:याखो:यात असलेल्या भगदरीच्या ग्रामस्थांनी गेल्या वर्षात घेतलेल्या पुढाकाराने गावाचा कायापालट होतो आह़े 
अक्कलकुवा तालुक्याच्या उत्तरेला 40 किलोमीटर अंतरावर सातपुडय़ाच्या चौथ्या रांगेत तापी आणि नर्मदा या दोन प्रमुख नद्यांच्या मधोमध साधारण 9 किलोमीटर व्यास क्षेत्रात 23 पाडय़ांचा समावेश असलेले संस्थानिकांची नगरी अशी ओळख असलेले भगदरी गाव आह़े कधी काळी मूलभूत सुविधांची वानवा असलेले हे गाव सध्या विकासपथावर आह़े केवळ लोकसहभागातून निर्माण होत असलेल्या नव्या भगदरी गावाने कात टाकून एक नवी ओळख मिळवण्यास सुरूवात केली आह़े ग्रामस्थांनी 100 टक्के सहभाग घेत गेल्या दोन वर्षात समस्या, उणिवा आणि आपसातील मतभेद बाजूला सारून गाव विकासाला प्राधान्य दिल्याने शेततळे, वनराई बंधारे, कुरण, वृक्षारोपण, शिक्षण, बचत गटांची निर्मिती, मूलभूत सुविधांसाठी पाठपुरावा, स्थलांतर रोखणे, पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम, कुक्कुटपालन, शेळीपालन, पशुपालन, मंिहलांसाठी कुटीरोद्योग निर्मिती यासह विविध उपक्रम राबवण्यास सुरूवात केली आह़े यामुळे गावात पाणी, वीज, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण या सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळत आहेत़ राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेल्या या गावात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि प्रशासकीय विभाग यांनी योग्य प्रकारे योगदान दिल्याने भगदरीची नंदनवन होण्याकडे वाटचाल सुरू झाली आह़े 
 
या विकास प्रक्रियेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गावात तीन सोलर हायमस्ट एलईडी, जिल्हा परिषद शाळेसाठी संगणक, भैय्यूजी महाराज संस्थेतर्फे 48 सोलर, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ता, दुरूस्ती व रूंदीकरण, इंदिरा आवास योजनेंतर्गत आतार्पयत 186 लाभार्थीना तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 82 लाभार्थीना घरे देण्यात आली आहेत़ 
यासोबत 23 पाडे आणि भगदरी गावाच्या घराघरात शौचालयांचे बांधकाम सुरू आह़े गरोदर माता, स्तनदा माता, नवजात शिशू, बालके यांची वेळोवळी तपासणी करण्यात येण्यात आह़े याठिकाणी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात येत आह़े 
आजघडीस गावात जलसिंचनाची कामे योग्य प्रकारे झाल्याने भूजल पातळी ही समतल आह़े यामुळे गावालगत शेती करणा:यांची शेती ही बागायती झाली आह़े आधुनिक शेती आणि भाजीपाला शेती यासाठी युवकांना मार्गदर्शन होत असल्याने येत्या काही दिवसात येथील उत्पादन जिल्हास्तरावर येणार आह़े या सर्व विकास प्रक्रियेत जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, माजी आमदार डॉ़ नरेंद्र पाडवी, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी आशा पाडवी, माजी पंचायत समिती उपसभापती पिरेसिंग पाडवी, सरपंच करमसिंग पाडवी यांनी बैठकांद्वारे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या़ तसेच चर्चा करून पाठपुरावा झाल्याने विकासाची प्रक्रिया अधिक वेगवान झाली आह़े 
जलव्यवस्थापनाची कामे वेगात 
विकासच्या मार्गावर असलेल्या भगदरी परिसरात वैयक्तिक सिंचन विहिरींची 19 कामे पूर्ण झाली आहेत़ एक शेततळे प्रगतीपथावर आह़े मातीनाला बांधाची दोन तर सिमेंट बंधा:यांची 9 कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आह़े धरणातील गाळ काढणे व ओंघळ नियंत्रणाची पाच कामे पूर्णत्वाकडे आहेत़ गावात लोकसहभागातून पाच वनराई बंधारे झाले असून त्यात आजही पाणीसाठा अबाधित आह़े या प्रत्येक विकासकामांसाठी बाहेरून मजूर आणण्यापेक्षा गावातील सर्वानी सहभाग देत कामे पूर्ण केली आहेत़ यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेतून वेतनही मिळाले आह़े 
द:याखो:या आणि ओसाड माळरान असल्याने याठिकाणी राहुरी कृषी विद्यापीठामार्फत 150 शेतक:यांना मोफत सहा हजार फळझाडे वाटप करण्यात आली होती़ यात आंबा, काजू, चिंकू  यांचा समावेश होता़ ही झाडे शेतक:यांनी श्रमदान करून शेतात लावली आहेत़ सर्व झाडांची योग्य प्रकारे वाढ झाल्याने परिसर हिरवाईने नटला आह़े  
एकीकडे जलव्यवस्थापनाची कार्र्ये होत असताना दुसरीकडे गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आह़े यात चार कोंबडीच्या पिलांचे पालन करण्यात येत आह़े याशिवाय महिला बचत गट आणि गावातील मजूरांचे संघटन करण्यात आले आह़े यात कुशल आणि अकुशल असे दोन्ही मजूर आहेत़
 
 (वार्ताहर)

Web Title: Such a story of village development came out of the stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.