निवडणुकीची अशी आली लहर गावात पडला कोरोनाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:26 AM2021-01-14T04:26:20+5:302021-01-14T04:26:20+5:30

डिसेंबर २०२०पर्यंत मुदत संपणाऱ्या ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम २०२०मध्ये सुरू झाला होता. यांतर्गत अर्ज छाननी व माघारीनंतर जिल्ह्यात २२ ...

Such a wave of elections fell on the village and Corona forgot | निवडणुकीची अशी आली लहर गावात पडला कोरोनाचा विसर

निवडणुकीची अशी आली लहर गावात पडला कोरोनाचा विसर

Next

डिसेंबर २०२०पर्यंत मुदत संपणाऱ्या ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम २०२०मध्ये सुरू झाला होता. यांतर्गत अर्ज छाननी व माघारीनंतर जिल्ह्यात २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातून ६४ ग्रामपंचायतीत सुरू झालेला प्रचार बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपासून थंडावला. या प्रचारादरम्यान कोविड नियमांनुसार वागण्याचा सल्ला निवडणूक आयोगाने उमेदवारांना दिला होता. यात प्रामुख्याने एका मतदाराकडे सहापेक्षा अधिक जणांनी जाऊ नये, मास्क, सॅनिटायझर व हँडग्लोव्हजचा वापर करावा, अशा सूचना केल्या होत्या. या सुचनानंतर बऱ्याच उमेदवारांनी पहिल्या दोन दिवसात त्यानुसारच प्रचार केला. परंतु मास्क घातल्यावर मतदार ओळखत नाही, असा संभ्रम झाल्याने मग विनामास्कच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान, यांतर्गत बुधवारी शेवटच्या दिवशी कोपर्ली, भालेर आणि हाटमोहिदे या तीन गावांमध्ये सुरू असलेल्या प्रचारात सहभाग घेतला असता, त्याठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्ते हे विनामास्क प्रचार करत असल्याचे दिसून आले. घरोघरी जाऊन मतदारांच्या पाया पडून मतदान करा म्हणून गळ घालणाऱ्या या उमेदवारांकडून नंतर हात धुण्याचा उपक्रमही होत नसल्याचे दिसून आले. गर्दीत एकमेकांपासून अंतर राखणेही जमत नसल्याचे समोर आले. यात प्रामुख्याने एकमेकांसोबत अगदी बारीक आवाजात कुजबुज करत चालणाऱ्यांची संख्याच अधिक होती. गावोगावी उपाययोजनांअभावी होत असलेल्या या प्रचारात बाहेरगावाहून निवडणुकीच्या मदतीला आलेल्यांचीही डोकेदुखी असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. अद्याप कोणात कोरोनाची लक्षणे दिसून आली नसली तरी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मतही काही ग्रामस्थांकडून यावेळी व्यक्त करण्यात आले.

कोविड नियमांनुसार सुरक्षा उपायांचा वापर करून प्रचार करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी कामकाज केले होते. मास्कचा वापर करण्यावर लक्ष देण्यात आले होते. गर्दीबाबत कोणतीही बंधने नव्हती. केवळ उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत सूचना होत्या. उमेदवारांनी त्या पाळल्या असल्याचे दिसून आले.

- भाऊसाहेब थोरात, तहसीलदार, नंदुरबार.

कोपर्ली

कोपर्ली ग्रामपंचायतीसाठी २३ उमेदवार रिगणात आहेत. गाव आणि प्रभाग मोठे असल्याने याठिकाणच्या प्रचार फेऱ्या लक्षवेधी होत्या. प्रचारादरम्यान कोविड नियमावलीनुसार उपाययोजना करण्यात उमेदवार मागे होते.

हाटमोहिदा

हाटमोहिदा गावाच्या तीन प्रभागात १८ उमेदवारांचा प्रचारही गर्दीत सुरू असल्याचे दिसून आले. उपाययोजनांना फाटा देत एकावेळी पाचपेक्षा अधिक जण मतदारांच्या घरी जाऊन भेटी-गाठी करत असल्याचे समोर आले.

भालेर

नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील चार प्रभागांच्या १३ जागांसाठी एकूण २९ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांकडून प्रचारावेळी कोरोना उपाययोजनांचा विसर पडल्यागत प्रचार सुरू आहे.

Web Title: Such a wave of elections fell on the village and Corona forgot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.