विद्याथ्र्याना वाढलेल्या वरणात निघाली पाल

By Admin | Published: April 1, 2017 05:37 PM2017-04-01T17:37:04+5:302017-04-01T17:37:04+5:30

येथील खाद्यपदार्थाबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

Suddenly, the students got up and started to grow | विद्याथ्र्याना वाढलेल्या वरणात निघाली पाल

विद्याथ्र्याना वाढलेल्या वरणात निघाली पाल

googlenewsNext

नंदुरबार येथील आदिवासी वसतिगृहातील प्रकार : संतप्त विद्याथ्र्याकडून कारवाईची मागणी

नंदुरबार, दि. 1- नंदुरबार येथील आदिवासी वसतीगृहात विद्याथ्र्यासाठी तयार केलेल्या वरणात पाल निघाल्याने येथील खाद्यपदार्थाबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.  या प्रकाराने खळबळ उडून  विद्याथ्र्यानी जेवणावर बहिष्कार टाकत आंदोलन छेडले. प्रकल्प अधिकारी निमा आरोरा यांनी कारवाईचे आश्वासन देवूनही विद्याथ्र्याचे समाधान झाल नाही. याप्रकरणी जिल्हाधिका:यांनाही निवेदन देण्यात आले.
या वसतीगृहात जेवणाचा ठेका देण्यात आलेला असून यापूर्वीच विद्याथ्र्याची निकृष्ट जेवनाबाबत तक्रार होतीच. त्यात शनिवारी सकाळी 11 वाजता विद्याथ्र्याना जेवन वाढत असताना त्यात मृत पाल आढळून आली. त्यामुळे विद्याथ्र्यामध्ये एकच खळबळ उडाली. विद्याथ्र्यानी वसतिगृहाबाहेर येवून आंदोलन केले व जेवणावर बहिष्कार टाकून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. या प्रकारानंतर प्रकल्प अधिकारी निमा आरोरा यांच्यासह इतर अधिकारी वसतीगृहात दाखल झाले. त्यांनी विद्याथ्र्याची समजूत काढण्याचा प्रय} केला व ठेकेदारावरही कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर संतप्त विद्याथ्र्यानी जिल्हाधिका:यांना याबाबत निवेदन दिले.    

Web Title: Suddenly, the students got up and started to grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.