दाखल गुन्हे मागे घेण्यावरून महिलेस कु:हाडीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:11 PM2017-08-10T17:11:05+5:302017-08-10T17:19:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पोलिसात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे या कारणावरून तिघांनी महिलेस कु:हाडीने मारून जखमी केल्याची घटना बर्डीपाडा, ता.नवापूर येथे 9 रोजी घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बर्डीपाडा येथील प्रमिलाबाई भामल्या गावीत यांनी फत्तेसिंग कातुडय़ा गावीत व इतरांविरुद्ध यापूर्वी पोलिसात गुन्हे दाखल केले होते. ते गुन्हे मागे घ्यावे यासाठी फत्तेसिंग व इतरजण प्रमिलाबाई यांच्या मागे तगादा लावत होते. त्यातून त्यांच्यात वाद होऊन फत्तेसिंग कातुडय़ा गावीत, जात्या कातुडय़ा गावीत, सुरेश फत्तेसिंग गावीत सर्व रा.बर्डीपाडा यांनी कु:हाडीने तसेच हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यात प्रमिलाबाई या जखमी झाल्या. तिघांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.