यंदाच्या हंगामात नंदुरबारात साडेपाच लाख क्विंटल साखर उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:24 PM2018-01-29T12:24:34+5:302018-01-29T12:24:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या वर्षाच्या ऊस पळवापळवीचा आणि इतर कारखान्यांकडून उसाचे पेमेंट वेळेत न मिळाल्याच्या पाश्र्वभुमिवर यंदा शेतक:यांचा कल स्थानिक कारखान्यांनाच ऊस पुरविण्याचा दिसून येत आहे. गेल्या 75 ते 80 दिवसाच्या हंगामात जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी एकुण पाच लाख 52 हजार 376 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. आणखी किमान दोन महिन्यापेक्षा अधिक काळ कारखाने चालतील असा अंदाज आहे.
जिल्ह्यातील सातपुडा साखर कारखाना, अॅस्ट्रोरिया शुगर व आदिवासी साखर कारखान्यांनी यंदा नियमितपणे नोव्हेंबर महिन्यापासून गाळपाला सुरुवात केली. तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मुबलक ऊस असल्यामुळे तिन्ही कारखान्यांनी आतार्पयत समाधानकारक गाळप केले आहे. तिन्ही कारखाने मिळून आणखी किमान दोन लाख क्विंटल साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
यंदा जिल्ह्यात ब:या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात नोंदीचा व बिगर नोंदीचा ऊस मिळून तिन्ही कारखाने आपल्या क्षमतेप्रमाणे चालतील असा अंदाज होता. परंतु यंदाचा साखर हंगाम आणखी किमान दोन महिना चालेल असा अंदाज आहे.
पळवा-पळवीला यंदा फाटा
गेल्यावर्षी इतर जिल्ह्यात उसाची कमतरता लक्षात घेता अनेक साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस पळविला होता. गुजरातमधील एका कारखान्याने जादा भाव देण्याचे अमिष दाखवून लाखो टन ऊस पळवून नेला होता. नंतर पेमेंट देतांना शेतक:यांची फिरवाफिरव केली होती. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतक:यांनी जिल्हाबाहेरील कारखान्यांना ऊस देण्याचे टाळले आहे.
काही कारखान्यांनी जिल्ह्यात गट कार्यालये देखील सुरू केली आहेत, परंतु त्यांना अद्याप फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.
तिन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने
यंदा जिल्ह्यातील सातपुडा, अॅस्ट्रोरिया व आदिवासी कारखाना पुर्ण क्षमतेने गाळप करीत आहेत. सातपुडा साखर कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार मे.टन प्रतिदिन आहे. या कारखान्याची एकच मील सध्या सुरू असली तरी त्यातही क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे तीन ते साडेतीन हजार मे.टन गाळप करीत आहे. अॅस्ट्रोरिया शुगर हा कारखाना देखील दैनंदिन साडेतीन ते चार हजार मे.टन गाळप करीत आहे. आदिवासी साखर कारखानाही दैनंदिन एक हजार 200 मे.टन र्पयत गाळप करीत आहे.
साखर उतारा
जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांचा साखर उतारा सरासरी दहाच्या आतच आहे. सर्वाधिक साखर उतारा हा आदिवासी साखर कारखान्याचा 9.88 इतका आहे. सातपुडा साखर कारखान्याचा साखर उतारा सरासरी 9.33 तर अॅस्ट्रोरिया शुगर कारखान्याचा उतारा सरासरी 9.39 इतका आहे. तिन्ही साखर कारखान्यांकडून सरासरी उतारा दहार्पयत नेण्याचा प्रयत्न सुरू असला तरी अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य नसल्याचे चित्र आहे.
पुढील वर्षी ऊस मिळावा यासाठी यंदा तिन्ही साखर कारखान्यांनी ऊस लागवडीसाठी शेतक:यांना प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ऊस बेण्यांची उपलब्धता, तांत्रिक मार्गदर्शन यासह इतर बाबींद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे ऊस लागवडीत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.