शहाद्यात प}ीवर कु:हाडीने वार करीत पतीची गळफास घेवून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:19 PM2017-10-10T12:19:15+5:302017-10-10T12:19:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : येथील कुकडेल परिसरातील सालदार नगरात घरगुती कारणावरून पतीने प}ीवर कु:हाडीने वार केला. त्यानंतर पतीने घरामागील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरारात्रीनंतर घडली. दरम्यान, पोलिसात केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरेश लालजी परमार (38) असे मयताचे नाव असून रेखा सुरेश परमार (31) जखमी महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुना प्रकाशा रस्त्यावरील कुकडेल शिवारातील सालदार नगर भागात पालिकेचे जुने जकात नाके आहे. या नाक्या लगत सुरेश लालजी परमार, त्याची प}ी रेखा सुरेश परमार व त्यांचे तीन आपत्य असे कुटुंब राहाते. मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील रहिवासी परमार कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी येथे गेल्या अनेक महिन्यांपासून वास्तव्यास आहे. पती-प}ीत गेल्या अनेक दिवसांपासून वाद होते. रविवारी मध्यरात्री देखील त्याच्यात वाद झाला. रागाच्या भरात सुरेश याने प}ीवर कु:हाडीने वार केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर स्वत: सुरेश याने घरामागे असलेल्या मोकळ्या जागेतील झाडाला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
जखमी रेखा परमार हिने आरडा ओरड करताच आजू-बाजूचे रहिवासी धावून आले. त्यांनी लागलीच पोलिसांना घटनेचे वृत्त दिल्याने पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. या वेळी जखमी महिलेवर पालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सायंकाळी शहादा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.