दुर्धर आजाराने ग्रस्त दाम्पत्याने मागितली आत्महत्येची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:49 PM2019-06-29T12:49:07+5:302019-06-29T12:49:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या दाम्पत्याने आत्महत्या करण्यास परवानगी देण्याची मागणी करत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या दाम्पत्याने आत्महत्या करण्यास परवानगी देण्याची मागणी करत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला़ यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी त्यांना ताब्यात समज देण्याचा प्रयत्न केला़
शहादा तालुक्यातील मंदाणे येथील पारुबाई मोतीलाल जाधव व मोतीलाल रामा जाधव हे दोघेही दुर्धर आजाराने पिडित आहेत़ त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात पाच वर्षापासून उपचार सुरु आहेत़ यातून दोघांकडून कोणत्याही प्रकारे काम होत नाही़ दरम्यान दोघांनी त्यांच्या विविध समस्यांचे निवेदन गुरुवारी जिल्हाधिकारी यांना दिले होत़े निवेदनात, मोतीलाल जाधव यांची सिलींगपूर ता़ तळोदा येथे वडीलोपाजिर्त शेती असून त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मकराम सोमा राठोड याने ही जमिन बळकावली आह़े याबाबत जाब विचारल्यावर राठोड याने जाधव कुटूंबावर प्राणघातक हल्लाही केला होता़ याबाबत असलोद औटपोस्टवर सातत्याने तक्रारी देऊनही कारवाई होत नसल्याने 9 वर्षीय मुलासह आत्मदहनाचा इशारा दोघांनी दिला होता़ दरम्यान शुक्रवारी सकाळी हे दाम्पत्य जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता, शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले होत़े त्याठिकाणी त्यांचे समुपदेशन करण्यात आल़े उशिरार्पयत पोलीस प्रशासन दोघांची चौकशी करत होत़े जाधव पतीपत्नीसह त्यांचा 9 वर्षाचा मुलगा शिवा यालाही दुर्धर आजार आह़े बळकावलेली जमिन परत मिळावी म्हणून दोघांनी मुलासह आत्महत्या करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आह़े