14 वर्षानी आला साखर वाटण्याचा योग

By Admin | Published: May 30, 2017 03:39 PM2017-05-30T15:39:03+5:302017-05-30T15:39:03+5:30

बोरद परिसर : धनपूर धरणाचे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव

The sum of the sugar found in 14 years | 14 वर्षानी आला साखर वाटण्याचा योग

14 वर्षानी आला साखर वाटण्याचा योग

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

बोरद,जि.नंदुरबार : 14 वर्षापासून रखडलेले धनपूर धरणाचे काम अखेरीस यंदा पावसाळ्यापूर्वी पुर्ण झाल्याने ग्रामस्थांकडून आनंदोत्सव साजरा करुन एकमेकांना साखर भरवण्यात आली़ त्यामुळे तब्बल 14 वर्षानंतर हा साखर वाटण्याचा योग आला असल्याच्या भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आल्या आह़े
धनपूर धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष जयसिंग माळी व समितीच्या सदस्यांनी या वेळी आनंदोत्सव साजरा केला़ ऐवढय़ा वर्षानतर  का असेना पण धनपूर धरणाचे काम पूर्ण झाल़े यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या धरणात पाणी अडविले जाणार असल्याने पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार असल्याचे सांगितले जात आह़े अनेक वर्षापासून परिसरातील पाण्याटंचाई लक्षात घेता या धनपूर धरणाचे अनन्यसाधारण महत्व आह़े धरणाचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील ग्रामस्थांचा प्रश्न कायमचा सूटला आह़े त्यामुळे ग्रामस्थांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आह़े या धरणामुळे 272 हेक्टर जमीनी सिंचनाखाली येणार आह़े याबाबत अक्कलकुवा देहली प्रकल्प उपविभागाचे सहाय्यक अभियंता क़ेबी़ पावरा  यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कॅनलमधून बंदीस्त पाईप लाईनच्या प्रस्तावाची                 निवीदा प्रक्रियेचे काम सुरु असून या परिसरातील 272 हेक्टर            जमीनीला पाण्याचे पाईप लाईनव्दारे पाणी दिले जाणार आह़े हे काम दिवाळीर्पयत युध्द पातळीवर पूर्ण करण्यात                  येणार असल्याचेही या वेळी  सांगण्यात आल़े यामुळे परिसरातील पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणात वाढणार आह़े धनपूर धरणाची लांबी 422 मीटर असून उंची 20 मीटर तर 106 मीटर खोली आह़े पहिलया वर्षी धरण भरल्यानंतर हळुहळु निझरा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ धनपूर धरणातून पाईपलाईनव्दारे शेतक:यांना पाणी पुरविण्यात येणार आह़े त्यामुळे परिसरातील शेतकरीही चांगलाच सुखावला आह़े 

Web Title: The sum of the sugar found in 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.