प्रभाग १० मध्ये स्वयंसेवकांद्वारे वस्तंूचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:11 PM2020-04-21T12:11:53+5:302020-04-21T12:12:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील सील करण्यात आलेला प्रभाग क्रमांक १० अनिश्चित काळासाठी सील राहणार आहे़ येथील कोरोनाबाधित ...

Supply of goods by volunteers in Division 1 | प्रभाग १० मध्ये स्वयंसेवकांद्वारे वस्तंूचा पुरवठा

प्रभाग १० मध्ये स्वयंसेवकांद्वारे वस्तंूचा पुरवठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील सील करण्यात आलेला प्रभाग क्रमांक १० अनिश्चित काळासाठी सील राहणार आहे़ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १९ जणांचे अहवाल नेगेटीव्ह आले असले तरी अद्याप काहींचे रिपोर्ट हे बाकी आहेत़ त्याच्या कुटूंबातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने पावले उचलत या भागात नागरिकांना सूचना करण्यात येत आहेत़
शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील एकास कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली होती़ या पार्श्वभूमीवर हा परिसर शनिवारपासून पूर्णपणे सील करण्यात आला आहे़ मंगळवारपासून ग्रीन झोन मध्ये असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेश अधिसूचना जारी करण्यात येऊन औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र तसेच शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत काही नियम शिथिल करण्याचा निर्णय झाला आहे़ यामुळे मंगळवारपासून शहर आणि जिल्ह्यातील जीवनमान काही प्रमाणात सुरळीत होणार आहे़ परंतू प्रभाग क्रमांक १० ला या अधिसूचनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ सोमवारी दुपारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी या भागात भेटी देत माहिती घेतली होती़ यानुसार १ किलोमीटरचा हा परिसर पूर्णपणे सील राहणार आहे़ या भागात राहणाºया नागरिकांची गैरसोय टाळता यावी यासाठी ५० घरांमागे एक स्वयंसेवी आणि शासकीय कर्मचारी यांची पथके नियुक्त करण्यात येणार आहेत़ स्वयंसेवकांची ही पथके मंगळवारपासून कार्यरत होणार असल्याची माहिती आहे़ यात शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे़ हा परिसर तब्बल एक किलोमीटरवर विस्तार आला आहे़ या परिसरावर पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन यांचे बारीक लक्ष असून येथून बाहेर पडणे किंवा आत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे़ या भागात पालिकेकडून निर्जंतुकीकरण सुरु असून जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत हा परिसर सील असेल, अशी माहिती आहे़


या भागात साधारण ९५० कुटुंब असून ४ हजार ६३२ नागरिक राहतात़ या क्षेत्राला १८ उपक्षेत्रात विभागण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी एक पथक कार्यरत करण्यात आले आहे. प्रत्येक उपक्षेत्रात नगर पालिका कर्मचारी किंवा शिक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. हे पथक सकाळी ८ ते १० या वेळेत रहिवाशांकडून आवश्यक वस्तूंची माहिती घेईल़ आणि सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान दरम्यान या वस्तू घरपोच पोहोचविण्यात येतील. दूधाचे वितरण घरोघरी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सहकार्य घेण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी घाबरून जावू नये आणि कोणत्याही कामासाठी बाहेर पडू नये. त्यांना समस्या असल्यास मंडळ अधिकारी झेड.एम. पठाण यांना ९१४५२०२२०५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे़

Web Title: Supply of goods by volunteers in Division 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.