आधार सुटलेल्या काँग्रेसला टेंभलीचा ‘आधार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:54 PM2019-05-27T12:54:32+5:302019-05-27T12:54:37+5:30

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशात काँग्रेस सरकारच्या राजवटीत आधार योजनेचा ज्या टेंभली, ता.शहादा या गावात ...

Support base for Congress | आधार सुटलेल्या काँग्रेसला टेंभलीचा ‘आधार’!

आधार सुटलेल्या काँग्रेसला टेंभलीचा ‘आधार’!

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : देशात काँग्रेस सरकारच्या राजवटीत आधार योजनेचा ज्या टेंभली, ता.शहादा या गावात शुभारंभ झाला ते टेंभली गाव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे आजही उभे राहिल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत अनेक बडय़ा काँग्रेस नेत्यांच्या गावांमध्ये भाजपला मताधिक्क्य असताना टेंभली गावातील जवळपास 85 टक्के मतदारांनी काँग्रेसला साथ दिली.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात टेंभली, ता.शहादा हे गाव 10 वर्षापूर्वी संपूर्ण भारतात चर्चेत आले. कारण त्याकाळी काँग्रेसची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या आधार कार्डची योजना टेंभली, ता.शहादा या गावापासून सुरुवात झाली. त्यासाठी तत्कालिन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग व काँग्रेसच्या तत्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी ह्या आल्या होत्या. या योजनेच्या शुभारंभानंतर सलग 10 वर्षे हे गाव योजनांच्या दुरवस्था व विविध प्रश्नांबाबत चर्चेत राहिले. विशेष म्हणजे गावात पंतप्रधान आल्यानंतरही काही दिवसातच या गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यांना सरकारी योजनेअंतर्गत दिलेले वीज मीटर काढून घेण्यात आले होते. त्यामुळे तेव्हा हा मुद्दा प्रचंड गाजला होता. दुसरीकडे काँग्रेसनेही आधार योजना दुय्यम केली. उलट त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने या योजनेचे महत्त्व वाढवले. असे असतानाही गावाने मात्र आजही आपला विश्वास काँग्रेसवरच असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. त्याला कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत टेंभली येथील मतदान केंद्रावर काँग्रेसला जवळपास 85 टक्के मतदान झाले. याठिकाणी झालेल्या एकूण 758 मतदानापैकी 646 मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी. पाडवी यांना मतदान केले आहे. तर भाजपच्या उमेदवार डॉ.हीना गावीत यांना केवळ 69 मते मिळाली आहेत. इतर उमेदवारांना एक ते तीन मते मिळाली तर 20 मतदारांनी सर्व उमेदवारांना नाकारत नोटाला मतदान केले आहे.
एकीकडे या मतदारसंघातील काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांच्या गावातही काँग्रेसला भाजपपेक्षा आघाडी घेण्यात यश आले नसताना टेंभली गावाने दिलेली काँग्रेसची साथ ही अनेक अर्थाने राजकारणात चर्चेत आली आहे. 

Web Title: Support base for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.