नंदुरबारातील धोकेदायक घाटमार्गाचे सव्रेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 05:52 PM2018-08-02T17:52:51+5:302018-08-02T17:52:55+5:30
‘आंबेनळी’ दुर्घटनेची पाश्र्वभूमी : शासनाकडे पाठविणार एकत्रित अहवाल
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील विविध धोकेदायक घाटमार्गाचे सव्रेक्षण करुन त्याची एकत्रित माहिती शासनाकडे पाठविण्यात येणार आह़े नंदुरबार, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचा:यांकडून बुधवारी त्या-त्या कार्यक्षेत्रातील धोकेदायक घाटांचे पायी चालत सव्रेक्षण करण्यात आल़े
28 जुलै रोजी पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचा:यांची बस कोसळून दुर्घटना झाली होती़ ही घटना ताजी असताना सार्वजनिक बांधकाम मंत्रालय खळबडून जागे झाले आह़े त्यामुळे शासनाकडून धोकेदायक ठरत असलेल्या घाटमार्गाची सध्याची स्थिती, त्यावर करण्यात येऊ शकणा:या उपाय योजना आदींबाबतचा अहवाल खात्याकडून मागविण्यात आला आह़े त्यानुसार नंदुरबार, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आपआपल्या कार्यक्षेत्रातील धोकेदायक घाटांचे सव्रेक्षण करुन माहिती गोळा करण्यात येत आह़े
नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता पी़ज़े वळवी, शाखा अभियंता ए़ज़े वळवी तसेच इतर कर्मचा:यांकडून तळोदा तालुक्यातील चांदसैली घाटाची पाहणी करण्यात आली आह़े या घाटावर कुठल्याही प्रकारचे सुरक्षा कठडे नाहीत़ त्यामुळे याबाबत कठडय़ांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता पी़ज़े वळवी यांच्याकडून देण्यात आलेली आह़े शहादा, अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आदी विभाग शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असून नंदुरबार व तळोदा विभाग नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत आहेत़ सर्वाधिक धोकेदायक घाटमार्ग हे शहादा विभागांतर्गत मोडत असल्याची माहिती देण्यात आली़
दरम्यान, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कमलाकर साळुंखे, शाखा अभियंता प्रवीण साळुंखे, अभियांत्रिकी सहाय्यक यशवंत ठाकरे आदी अधिकारी व कर्मचा:यांनी बुधवारी पायी चालत शहादा विभागांतर्गत मोडल्या जाणा:या घाट मार्गाची पाहणी केली आह़े याचा सर्वाचा एकत्रित अहवाल हा शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर उपाय योजनांबाबत कार्यवाही होणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले आह़े
जिल्ह्यातील रोषमाळ-धडगाव व कोठार-तळोदा घाटमार्ग तसेच महामार्ग क्रमांक तीनवरील मोलगी-डाब-अक्कलकुवा हे चार घाटमार्ग अत्यंत धोकेदायक असल्याचा अहवाल या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आह़े त्यामुळे संबंधित मार्गाची पाहणी करून त्या ठिकाणी सर्व उपाय योजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े
सातपायरी घाट धोकेदायक
राज्यभरातील पर्यटक शहादा येथील तोरणमाळ या पर्यटनस्थळी दाखल होत असतात़ तोरणमाळला जाण्यासाठी सातपायरी घाटाला ओलांडून जावे लागत असत़े हा घाट अत्यंत धोकेदायक असून टप्प्या-टप्प्यानी येणा:या वळणांमुळे येथून जात असताना अक्षरश जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत असतो़ या घाटाला संरक्षक कठडेसुध्दा नाहीत़
‘आंबेनळी’ सारखी एखादी दुदैवी दुर्घटना घडण्यास या ठिकाणीसुध्दा वाव निर्माण होऊ शकतो़ सध्या पावसाळी दिवस असल्याने पर्यटकांकडून तोरणमाळला जाण्यास अधिक पसंती देण्यात येत असत़े घाटांवर होणारे भूस्खलन हेसुध्दा अपघातास मोठे कारण ठरत़े त्यामुळे घाटमार्गावरील भूस्खलन रोखण्यासाठी गॅबियन पध्दतीचा वापर उपयुक्त ठरु शकतो़ या पध्दतीमध्ये घाटाच्या पायथ्यालगत चौकोनाकृती बॉक्स ठेवण्यात येत असतात़ त्यात दगडे ठेवली जातात़ पावसाचे पाणी आल्यास ते घाटाच्या लगत ठेवलेल्या गॅबियन बॉक्समधून वाहत जातात़