चिखली येथे ऊस क्षेत्राची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:48 PM2018-06-16T12:48:58+5:302018-06-16T12:48:58+5:30

सातपुडा साखर कारखाना : ऊस तज्ज्ञांकडून शेतक:यांना मार्गदर्शन

Survey of sugarcane area at Chikhli | चिखली येथे ऊस क्षेत्राची पाहणी

चिखली येथे ऊस क्षेत्राची पाहणी

Next

शहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे आयोजित ‘सातपुडा मिशन 100’ या कार्यक्रमांतर्गत चिखली दिगर येथील चंद्रसिंग नाईक यांच्या ऊस क्षेत्रावर नवीन वाणाच्या बेणेमळ्यातील उसाची पाहणी करण्यात आली.
या वेळी कृषी तज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी ऊस उत्पादक सभासदांना मार्गदर्शन करतांना ऊस उत्पादन वाढ करावयाची असेल तर यापुढे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरी सभासदांनी केला पाहिजे. सध्याची ऊसाची परिस्थिती लक्षात घेता, पीक संरक्षण उपाययोजनांमध्ये जैवीक किटकनाशकांचा वापर सर्वच ठिकाणी वाढला पाहिजे, असे सांगितले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सांगितले की, ऊस लागवडीचे 2018-19 चे नियोजन प्रत्येक सभासद शेतक:यांना देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे या हंगामात आडसाली उसाची लागवड 15 जुलैपासून करावी.  या हंगामासाठी नोंद केलेल्या उसाच्या गाववार याद्या प्रत्येक गावातील सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालयात पाहण्यासाठी लावलेल्या आहेत. त्यात काही तक्रारी असल्यास 30 जूनर्पयत जवळच्या गटकार्यालय व केंद्र कार्यालयात आपल्या तक्रारी नोंदवाव्यात .गेल्या हंगामामध्ये साखरेचे दर कमी झाले असले तरी चेअरमन दीपक पाटील व संचालक मंडळाने जाहीर केलेल्या दराप्रमाणेच शेतक:यांचे उसाचे पेमेंट अदा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन डॉ.सुरेश नाईक यांनी केले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक शशिकांत गोविंद पाटील, विठ्ठल पाटील, सुभाष देविदास पाटील, गोपाळ शंकर पाटील, डॉ.गणेश पाटील, सुदाम कुवर, सरवरसिंग पटले, कारखान्याचे गट कर्मचारी गोकूळ बोरसे, विलास पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी गणेश चव्हाण यांनी तर आभार मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत यांनी आभार मानले.
दरम्यान, कारखान्यामार्फत म्हसावद, मोड, फेस या गावामधील आडसाली ऊस लागवड व खोडवा व्यवस्थापन या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला.

Web Title: Survey of sugarcane area at Chikhli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.