जादूटोणा केल्याच्या संशयावरून मायलेकाला धमकावले, नंदुरबारधील धक्कादायक प्रकार उघडकीस

By भूषण.विजय.रामराजे | Published: November 7, 2023 06:31 PM2023-11-07T18:31:21+5:302023-11-07T18:31:57+5:30

अल्पवयीन मुलावर जादूटोणा करत त्याला ठार केल्याचा संशय घेतल्याचे प्रकरण

Suspected of witchcraft, Mother And Son was threatened in Nandurbar | जादूटोणा केल्याच्या संशयावरून मायलेकाला धमकावले, नंदुरबारधील धक्कादायक प्रकार उघडकीस

जादूटोणा केल्याच्या संशयावरून मायलेकाला धमकावले, नंदुरबारधील धक्कादायक प्रकार उघडकीस

भूषण रामराजे,लोकमत न्यूज नेटवर्क,नंदुरबार : सध्या भारत देश आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे.चांद्रयान सारख्या मोहिमा यशस्वी भारताने जगासमोर एक नवा आदर्श निर्णाण केला आहे. त्यातचं नंदुरबारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.नंदुरबारमध्ये एका अल्पवयीन मुलावर जादूटोणा करत त्याला ठार केल्याचा संशय घेत एकाने गावातीलच माय-लेकराला जिवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.  गोरंबा पठालीपाडा, ता. धडगाव येथे हा धक्कादायक घटना घडली आहे.संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

वारंवार मिळणाऱ्या धमक्यांना घाबरून २८ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान मृत मुलाची आई आणि मुलाने पोलिस ठाणे गाठत आपबिती कथन केली होती. आपल्यासोबत घडणाऱ्या संपूर्ण प्रकाराचा तपशीलवार माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. याप्रकरणी नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

हान्या राज्या वळवी (३५) रा. गोरंबा पठाली पाडा हा त्याच्या आईवर दिलवरसिंग सिपा वळवी (३५) हा मुलाच्या मृत्यूबद्दल संशय घेत होता. हान्या व त्याच्या आईने आपला मुलगा कल्पेश याच्यावर जादूटोणा करून ठार केल्याचा दावा केला होता. असा आरोप करत २८ ऑक्टोबरपासून आई व मुलाला शिवीगाळ करत होता.आपला मुलगा गमावलेल्या आईला  तुम्हाला ठार मारू अशी धमकी देतहे प्रकरण वाढवले. यादरम्यान दिलवरसिंग वळवी याने हान्या वळवी यांच्या आईला डाकीण असल्याचे हिणवत जिवे मारण्याची धमकी दिली होती.त्या यादरम्यान या प्रकरणाला नवे वळणं आले. सिपा पारशी वळवी (६०) व अशोक राल्या वळवी (३०) यांनी हान्या आणि त्याच्या आईची बदनामी करून मारहाण केली होती. साधारणत आठवडाभर सुरू असलेल्या प्रकारानंतर हान्या वळवी याने धडगाव पोलिस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादीवरून दिलवरसिंग वळवी (३५), सिपा वळवी (६०) व अशोक वळवी (३०) या तिघांविरोधात महाराष्ट्र जादूटोणा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Suspected of witchcraft, Mother And Son was threatened in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.