१५ जणांचे स्वॉब तपासणीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:32 PM2020-04-19T12:32:52+5:302020-04-19T12:33:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व त्याने ज्या खाजगी दवाखान्यात उपचार घेतला तेथील अशा १५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व त्याने ज्या खाजगी दवाखान्यात उपचार घेतला तेथील अशा १५ जणांना क्वॉरंटाईन करून त्यांच्या स्वॉबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. याशिवाय रुग्ण आणखी कुठे आणि कुणाशी संपर्कात आला याचीही माहिती घेतली जात आहे.
नंदुरबारात आढळून आलेला रुग्णाची पार्श्वभुमी शोधण्याचे काम प्रशासनाने शुक्रवारी रात्रीपासूनच सुरू केले होते. रुग्ण नेमका कुठल्या भागातून प्रवास करून आला याची आधी चौकशी करण्यात आली. शुक्रवारी रात्रीच प्रशासनाने ती माहिती काढली.
त्यानुसार या रुग्णाने त्याला त्रास होत असल्याने आधी एका खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्या रुग्णालयातील डॉक्टरांना लागलीच होम क्वॉरंटाईन करण्यात आले तर तेथील पाच जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्याच्या स्वॉबचे नमुने घेण्यात आले.
त्यानंतर लागलीच रुग्णाच्या घरातील व त्यांचा संपर्कात आलेल्या नऊ जणांना कॉरंटाईन केंद्रात पाठविण्यात आले. त्यांच्याही स्वॉबचे नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. रुग्णाकडून आणखी माहिती घेतली जात आहे.
रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आपली काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.