हागणदारी मुक्तीवर स्वच्छाग्रहींची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:36 AM2021-09-15T04:36:04+5:302021-09-15T04:36:04+5:30
भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात शाश्वत हागणदारीमुक्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा ...
भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात शाश्वत हागणदारीमुक्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. यांतर्गत नंदुरबार तालुक्यात गटविकास अधिकारी महेश वळ्वी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छाग्रहीसाठी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत ग्रामस्थांची भूमिका, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक गटविकास अधिकारी एल. जे. पावरा, मुख्य प्रशिक्षक शिवकुमार शर्मा, प्रकल्प व्यवस्थापक आकांक्षा बोरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मंगेश निकम यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षक शिवकुमार शर्मा यांनी मार्गदर्शन करताना उघड्यावरील शौचाचे दुष्परिणाम याविषयी माहिती देत शौचालय वापराबाबत मानसिकतेत बदल आवश्यक असल्याचे सांगितले. प्रीतेश्वर पाटील, अर्जुन कडवे, नितीन महानुभव, निशांक गजभिये, संतोष नगारे, अभिजीत मैदाड, अनिल पवार, विजय गावीत, राकेश गुरव, वैभव खांडवी, सुनीता भोये, मारोती चिमनकर, किशोरी शेवाळे, नीलेश पगारे, दारासिंग पावरा आदी उपस्थित होते.