आमलाड येथे स्वाईन फ्ल्यूचा रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:33 PM2018-11-02T13:33:32+5:302018-11-02T17:45:59+5:30

चिनोदा : आमलाड ता.तळोदा येथील एकास स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यास उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात ...

Swine flu patient at Amalad | आमलाड येथे स्वाईन फ्ल्यूचा रूग्ण

आमलाड येथे स्वाईन फ्ल्यूचा रूग्ण

googlenewsNext

चिनोदा : आमलाड ता.तळोदा येथील एकास स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यास उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले आह़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपासणी करणा:या आरोग्य पथकाने 12 जणांची तपासणी करत त्यांना संशयित म्हणून जिल्हा रूग्णालयात पाठवले आह़े 
कृष्णा काशीनाथ कोळी (33) असे लागण झालेल्या व्यक्तीचे नाव असून गेल्या 15 दिवसांपासून ते आजारी होत़े त्यांच्यावर नंदुरबार येथील खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होत़े परंतू प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होत़े याठिकाणी त्यांची तपासणी झाल्यानंतर स्वाईन फ्ल्यू असल्याचे स्पष्ट खाजगी रूग्णालयाने स्पष्ट केले होत़े या माहितीनंतर तळोदा तालुका आरोग्य विभागाने उपाययोजनांना सुरुवात केली़ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांच्यासह आरोग्य पथकाने गुरुवारी आमलाड येथे जाऊन कृष्णा कोळी यांच्या कुटूंबातील सदस्यांची तपासणी केली़ यानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आह़े 
स्वाईन फ्ल्यूचा रूग्ण आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी सावित्रीबाई खर्डे यांनी येथे भेट दिली़ यावेळी सरपंच सदाशिव ठाकरे उपस्थित होत़े  याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण,  डॉ़ कांतीलाल पावरा, आरोग्य सेवक आऱएस़वळवी, डी़व्ही़पावरा, आऱ व्ही़वळवी, सरीबाई वळवी, चंद्रकला पावरा, एस़आऱमुके, निखिल तुपे, सतीष जाधव, रामेश्वर धुमाळ, अशोक पाडवी, मनोज पिंजारी, पंकज धनगर, डी़डी़वळवी, आऱव्ही़मालकर यांचे पथक तैनात आह़े 
 

Web Title: Swine flu patient at Amalad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.