रायखेड व नंदुरबारात दोन गावठी कट्टय़ासह तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:25 PM2018-05-17T12:25:33+5:302018-05-17T12:25:33+5:30

म्हसावद व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा, तिघांना अटक

Swords seized with two cloth khatas in Raikhed and Nandurbar | रायखेड व नंदुरबारात दोन गावठी कट्टय़ासह तलवारी जप्त

रायखेड व नंदुरबारात दोन गावठी कट्टय़ासह तलवारी जप्त

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 17 : म्हसावद पोलिसांनी केलेल्या कारवाईत रायखेड येथे दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नंदुरबारातदेखील   एलसीबीने कारवाई करीत एकतानगरातून दोन तलवारी जप्त केल्या. 
महाराष्ट्र-मध्य प्रदेश सिमेवर अनेक वेळा तस्करीने येणारे गावठी कट्टे जप्त करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या रॅकेटला समुळ            नष्ट करण्यात अद्यापही मध्यप्रदेश किंवा महाराष्ट्र पोलिसांना यश आले नाही. सोमवारी झालेली कारवाई देखील त्याचेच प्रतिक आहे.           शनिवार, 12 मे रोजी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात दोन जण गावठी रिव्हाल्वर विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील             यांना मिळाली.  त्यानुसार त्यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राकेश चौधरी यांना कारवाईच्या सुचना देवून मार्गदर्शन केले. म्हसावद पोलीस पथकाने  खेडदिगर बस स्थानक परिसरात सापळा रचुन आरोपींना जेरबंद केले. त्यात रिपु राजू मोरे (वय 25) रा. शिवनगर टेकडी, पानसेमल जि. बडवानी,  राजेश भगवान गोले (वय 22) रा.बडपुरा मोहल्ला, पानसेमल जि.बडवानी (मध्यप्रदेश) यांचा सममावेश आहे. दोन्ही रिव्हाल्वर दोघांनी कमरेला खोचलेले                  होते. त्यांच्याकडून जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले. म्हसावद पोलिसात रिपू मोरे व राजेश गोले यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपअधीक्षक महारू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, पोलिस उपनिरीक्षक के.टी. दाभाडे, हवालदार प्रदीप राजपूत, चंद्रकांत चव्हाण, छोटू शिरसाठ, राजेंद्र         काटके भाऊसाहेब गिरासे, घनशाम सुर्यवंशी , विश्वास साळुंखे, कांतिलाल वळवी, सिद्धार्थ सुरवाडे यांनी कारवाई केली.
नंदुरबारात तलवारी जप्त
नंदुरबारातील एकतानगरात देखील एलसीबीने दोन तलवारी जप्त केल्या. शहरातील एकता नगरात नगरसिंग ओंकारसिंग शिकलीकर हा नंदुरबारात तलवारी विकण्याच्या उद्देशाने तलवार बाळगून असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यांनी एकतानगरात धाड टाकली असता शिकलीकर यांच्याकडे दोन तलवारी आढळून आल्या. त्याच्याविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, सहायक निरिक्षक गणेश न्हायदे, जमादार अनिल गोसावी, हवालदार विकास पाटील, रवींद्र पाडवी, दिपक गोरे, विनोद जाधव, जगदीश पवार, प्रमोद सोनवणे, भटू धनगर, गोपाल चौधरी, किरण पावरा, संदीप लांडगे, जितेंद्र ठाकुर, राहुल भामरे, किरण मोरे, मोहन ढमढेरे, तुषार पाटील, महेंद्र सोनवणे, पंकज महाले, अमोल पवार यांनी केली.
 

Web Title: Swords seized with two cloth khatas in Raikhed and Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.