साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:34 AM2021-09-22T04:34:16+5:302021-09-22T04:34:16+5:30
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहरात वाढत्या मलेरिया, डेंग्यू व साथीच्या रोगांची एकूण परिस्थिती पाहता सध्या या आजाराचे रुग्ण ...
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहरात वाढत्या मलेरिया, डेंग्यू व साथीच्या रोगांची एकूण परिस्थिती पाहता सध्या या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. खाजगी व शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर या साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. मागील आठवड्यात यावल येथे एका युवकाचा तर धुळे येथे एका बालकाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. नंदुरबार शहरातही अशा जीवघेण्या आजारामुळे कोणाच्या मृत्यूची वाट तर नंदुरबार नगरपालिका पाहत नाही ना? असे नागरिकांना वाटू लागले आहे. नगरपालिकेतर्फे हे साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसतर्फे नंदुरबार पालिकेविरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, शहर कार्याध्यक्ष कालू पैलवान, संघटक जितू ठाकरे, उपाध्यक्ष लाला बागवान, संजय मराठे आदी उपस्थित होते.