शहाद्यातील घर फोडून सहा लाखांचे दागिने लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:08 PM2018-07-25T13:08:46+5:302018-07-25T13:08:50+5:30
अडीच लाखाची रोकड : सहा लाख रूपयांचे दागिने लांबवले
शहादा : शहरातील दीनदयाल नगरात बंद घरफोडून चोरटय़ांनी साडेआठ लाख रूपयांचा ऐवज लंपास केला़ दागिने आणि रोख रक्कम चोरटय़ांनी लांबविली़ मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली़
दीनदयाल नगरात राहणारे प्रा़ डी़सी़ निकुंभ यांच्या मुलीचा विवाह 23 रोजी पार पडला़ विवाहानंतर मुलीच्या वरणगाव येथील सासरी स्वागत समारंभ असल्याने निकुंभ परिवार सोमवारी वरणगाव येथे रवाना झाला होता़ यामुळे त्यांच्या घराला कुलूप होत़े ही संधी साधून चोरटय़ांनी रात्री त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले 10 तोळे वजनाचे साधारण 6 लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने, लगA सोहळ्याच्या खर्चासाठी घरात ठेवलेले 2 लाख 50 हजार असा एकूण साडे आठ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला़ चोरटय़ांना घराची खडानखडा माहिती असल्याने त्यांनी केवळ मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता़ त्यानंतर बेडरूममधील कपाटात ठेवलेले पैसे आणि दागिने त्यांनी लांबवल़े चोरीचा हा प्रकार घडत असतानाच प्रा़ निकुंभ यांची कन्या आणि जावई हे कारने पहाटे चार वाजेच्या सुमारास घरी आल़े त्यांना वरच्या मजल्यावरील बेडरूमचे सर्व लाईट सुरू असल्याचे तसेच आत कोणीतरी गप्पा मारत असल्याचे दिसून आल़े त्यांची चाहूल लागल्यानंतर चोरटे घरातून बाहेर पळाल़े पळणा:या तिघांचा त्यांनी कारने पाठलाग केला़ परंतू गाडगेबाबा मठापासून तिघे पळ काढण्यात यशस्वी झाल़े घटनेनंतर तातडीने शहादा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली़ पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी भेट देत पाहणी केली़ प्रसंगी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होत़े श्वानाने मुख्य रस्त्यार्पयत माग काढला़ याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम शहादा पोलीस ठाण्यात सुरू होत़े विवाह सोहळ्याच्या दुस:याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत होती़ चोरटे माहितीतील असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली असून बेडरूममधील कपाट वगळता इतर कोणत्याही साधनाला त्यांना हात लावलेला नसल्यापे पोलीसांना दिसून आल़े कोणीतरी आल्याची चाहूल लागल्यानंतर चोरटे चक्क मेनगेटने बाहेर येऊन पळाल़े घटनेमुळे शहादा शहरात एकच खळबळ उडाली आह़े