‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारसह ग्रामीण भागात रब्बी पिकांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:44 PM2017-12-06T16:44:27+5:302017-12-06T16:44:35+5:30

Takhani of 'Okhi' with water at rabi crops in rural areas including Nandurbar | ‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारसह ग्रामीण भागात रब्बी पिकांवर पाणी

‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारसह ग्रामीण भागात रब्बी पिकांवर पाणी

Next
ठळक मुद्देआगामी 36 तासात मुसळधार पावसाचा अंदाज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला केंद्रीय हवामान खात्याने ओखी वादळामुळे निर्माण होणा:या गंभीर स्थितीची माहिती कळवली आह़े यानुसार सर्व तहसील कार्यालयात सतर्कता बाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ येत्या 36 तासात जि

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ओखी वादळाचा परिणाम जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून जाणवण्यास सुरूवात झाली़ यामुळे जिल्ह्यातील विविध भागात संततधार पाऊस होऊन शेतशिवार जलमय झाल़े पावसामुळे पेरणी झालेला गहू, फुलावर आलेला हरभरा आणि बोंडाबाहेर आलेला कापूस यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आह़े 
आज सकाळी अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर, नंदुरबार, शहादा शहरांसह ग्रामीण भागात तुरळक पावसाचे थेंब कोसळत होत़े सकाळी 9 नंतर पावसाच्या मध्यम सरी बरसण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांची शहरी भागात नागरिकांची तर ग्रामीण भागातील शेतशिवारात शेतकरी आणि मजूरांची धावपळ उडाली़ हिवाळ्यात कोसळणा:या अतीशित सरींमुळे अनेकांना हुडहुडी भरली होती़ ओखी वादळामुळे जिल्ह्यात आगामी 36 तास पावसाची स्थिती कायम राहणार आह़े 
 

Web Title: Takhani of 'Okhi' with water at rabi crops in rural areas including Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.