गर्दीचा फायदा घेत महिलेची पर्स लंपास; ९४ हजारांचा मुद्देमाल लंपास

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: April 19, 2023 06:33 PM2023-04-19T18:33:36+5:302023-04-19T18:33:53+5:30

शहर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Taking advantage of the crowd, the woman's purse was looted; 94 thousand items lost | गर्दीचा फायदा घेत महिलेची पर्स लंपास; ९४ हजारांचा मुद्देमाल लंपास

गर्दीचा फायदा घेत महिलेची पर्स लंपास; ९४ हजारांचा मुद्देमाल लंपास

googlenewsNext

नंदुरबार :बाजारातून जाणाऱ्या महिलेच्या बॅगेतील ९० हजारांची सोन्याची पोत व चार हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नंदुरबारातील मंगळ बाजार परिसरात घडली. शहर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नंदुरबारात बाजाराच्या दिवशी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ही हातसफाई केली. ठाणे येथील आशा शशिकांत खानविलकर (५६) या नंदुरबारात त्यांच्या भाचीकडे आल्या होत्या. खानविलकर व संध्या कैलास चौधरी (३०) या नंदुरबारातील मंगळ बाजारातून जात होत्या. भोई गल्ली ते मंगळ बाजारदरम्यान गर्दीतून जात असताना त्यांच्याजवळ असलेल्या काळ्या बॅगेतील पर्स चोरट्यांनी चोरून नेली. पर्समध्ये ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व चार हजार रुपये रोख होते.

याशिवाय एटीएम कार्ड व इतर शासकीय कागदपत्रे होती. बाजारात त्यांनी पर्स चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शोधाशोध केली; परंतु उपयोग झाला नाही. याबाबत आशा खानविलकर यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार संदीप गोसावी करीत आहेत.

Web Title: Taking advantage of the crowd, the woman's purse was looted; 94 thousand items lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.