तळोदा परिसरात बिबटय़ाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 06:10 PM2017-08-02T18:10:28+5:302017-08-02T18:10:49+5:30
वनविभागाने लक्ष देण्याची मागणी
ऑनलाईन लोकमत रांझणी,जि.नंदुरबार, दि.2 - तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन परिसरात बिबट्याच्या संचाराने परिसरातील ग्रामस्थांसह मजुरांमध्ये भितीचे वातावरण कायम आह़े याचा परिणाम शेतीकामांवरदेखील झालेला आह़े गेल्या आठवडय़ात रेल्या हुरज्या तडवी यांच्या गोठय़ातून दोन शेळ्यांना बिबटय़ाने ठार केले होते. दोन दिवसांपूर्वी रोणज्या तडवी यांच्या नाल्याकाठी असलेल्या घराजवळील गोठय़ातूनही लहान गो:हा अचानक बेपत्ता झाला होता़ वनविभागाकडून परिसरात वावरत असलेल्या बिबटय़ाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी होत आह़े तळोदा तालुक्यातील मोहिदा परिसरात असलेल्या एका शेतात बिबटा दिसून आला होता़ त्यानंतर मोड परिसरातही बिबटय़ाला शेतक:यांनी पाहिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होत़े त्यामुळे तळोदा तालुक्यात बहुतेक ठिकाणी बिबटय़ांचा संचार वाढला असल्याने शेतक:यांकडून भिती व्यक्त करण्यात येत आह़े