तळोदा पालिकेचा प्रस्ताव : कापलेल्या झाडांचे होणार पुनरूज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:26 PM2018-01-20T12:26:54+5:302018-01-20T12:27:03+5:30

Taloda municipal proposal: cut trees will be revived | तळोदा पालिकेचा प्रस्ताव : कापलेल्या झाडांचे होणार पुनरूज्जीवन

तळोदा पालिकेचा प्रस्ताव : कापलेल्या झाडांचे होणार पुनरूज्जीवन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिनोदा : तळोदा नगरपालिकेने शहरातील रस्ता रूंदीकरणाच्या कामांना सुरूवात करण्यात आली आह़े यात रस्त्याच्या दुतर्फा अडथळा ठरणारी 20 झाडे तोडून त्यांचे लाकूड अमरधामला देण्यात येणार आहेत़ तसेच यातील काही झाडांचे दुस:या जागांवर पुनरूज्जीवन करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आह़े  
तळोदा शहरातील वनविभाग तपासणी नाका ते बसस्टँड य्यादरम्यान रस्ता रूंदीकरण आणि सुशोभिकरण करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आह़े यासाठी या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमण काढून रस्ता रूंद करण्याचे काम गुरूवारी सुरू करण्यात आल़े याअंतर्गत या मार्गावरील 20 झाडे रूंदीकरणाच्या कामाला अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने पर्यावरण विभागाची परवानगी घेत, झाडे तोडण्यास सुरूवात केली आह़े 50 वर्षार्पयत वय असलेल्या या झाडांपैकी काही झाडे पूर्णपणे जीर्ण तर काही झाडे ही चांगल्या स्थितीत आहेत़ यातील चांगल्या स्थितीत असलेल्या झाडांचे दुस:या जागांवर विस्थापन करण्याची तयारी पालिकेने दर्शवली आह़े यासाठी पालिका पर्यावरण विभाग आणि पर्यावरणासाठी काम करणा:या संघटना यांचे मार्गदर्शन मागवणार असल्याचे सांगण्यात आले आह़े  तर जुनाट व जीर्ण झाडे तोडण्यास सुरूवात करण्यात आली आह़े  तोडलेल्या झाडांचे लाकूड शहरातील नागरिकांना अमरधाममध्ये मोफत देण्यात येणार असल्याने त्याचा साठा त्याच ठिकाणी करण्यात येणार आह़े 
या रस्त्याचे रूंदीकरण आणि सुशोभिकरणाची जुनी मागणी होती़ यानुसार मार्गावर दुभाजक टाकून रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक आणि काही ठिकाणी ज्येष्ठांच्या सोयीसाठी बाकडे टाकण्यात येणार आहेत़ 
 

Web Title: Taloda municipal proposal: cut trees will be revived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.