तळोदा पालिकेतर्फे दीडशे दुकानांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:34 PM2018-07-24T13:34:01+5:302018-07-24T13:34:06+5:30
प्लॅस्टिक बंदी : विशेष पथकाकडून ठिकठिकाणी मार्गदर्शन
तळोदा : तळोदा पालिकेतर्फे प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याबाबत शहरातील दुकानदार, व्यावसायिक यांना प्रत्यक्ष भेटून दुकानांची तपासणी करण्यात आली़ या सोबतच त्यांना प्लॅस्टिक बंदीचे महत्व पटवून देण्यात आल़े
शहरात पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी प्लॅस्टिक बंदीबाबत दुकानदार, व्यावसायिक यांच्याकडे जात बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत़
त्याच प्रमाणे पर्यायी साधनांचा वापर करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात येत आह़े प्लॅस्टिक बंदी मागची भुमिका स्पष्ट करत जनजागृती करण्यात येत आह़े जनजागृतीसाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले आह़े या पथकात पालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र माळी हे पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत़
तर, त्यांच्यासह सुरेंद्र वळवी, महेंद्र वाघ, मोतीलाल गोनरे, कमलेश कलाल या कर्मचा:यांचाही समावेश आह़े या पथकाव्दारे जनजागृती कार्याला प्राधान्य देण्यात येत आह़े या दरम्यान त्यांनी शहरातील 150 दुकानदार, व्यावसायिक यांना प्रत्यक्ष भेट देत दुकानांची तपासणी केली आह़े शहरातील नागरिकांनीही प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करावी, प्लॅस्टिक ऐवजी पर्यायी व्यवस्थांचा अवलंब करावा असे आवाहन मुख्याधिकारी जनार्दन पवार, व नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्याकडून करण्यात आले आह़े